शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 4:35 PM

बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले कर्नाटकात खळबळ : हुक्केरी येथील एका कार्यक्रमात केले सुतोवाच

राम मगदूम गडहिंग्लज : बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

१० वर्षांपूर्वी त्यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर त्यांना कॅबिनेटमंत्रीपदासह बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील मिळाले होते.परंतु, आता राज्यात भाजपची सत्ता येऊनदेखील मंत्रीमंडळात समावेश न झाल्याने ते गेल्या कांही महिन्यांपासून नाराज आहेत.दरम्यान,कनिष्ठ बंधू माजी खासदार रमेश यांना राज्यसभेवर संधी मिळावी म्हणून त्यांनी फिल्डींग लावली होती. त्यासाठी 'उत्तर कर्नाटकातील आमदारांसाठी स्नेहभोजन' ठेवून त्यांनी नेतृत्वावर दबाव आणला होता.त्यावेळी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी मंत्री मंडळात स्थान देण्याचे त्यांना आश्वासन दिले होते.सोमवारी (२२) हुक्केरी येथे 'विश्वराज ट्रस्ट'तर्फे आशा वर्कर्सना जीवनावश्यक वस्तू वाटपप्रसंगी त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला. त्यासाठीचा अनुभव व योग्यताही आपल्याकडे आहे, हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत.त्यांच्या या वक्तव्याने पावसाळ्यातहीकर्नाटकचे राजकारण तापले आहे.कत्ती नेमकं काय म्हणाले..?मी, ८ वेळा आमदार झालो,१३ वर्षे मंत्री होतो.त्यामुळे पुन्हा मंत्रीपद मिळेल, परंतु आता मला त्यात स्वारस्य नाही.तुमचा आशीर्वाद असेल तर उत्तर कर्नाटकचा सुपुत्र या राज्याचा मुख्यमंत्री होईल,असा विश्वास कत्ती यांनी व्यक्त केला. 'रमेश'ना डावलल्याची खदखदलोकसभा निवडणुकीत भाजपने चिक्कोडी मतदार संघात रमेश कत्ती यांना डावलून आण्णासाहेब ज्वोल्ले यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी 'रमेश'ना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्र्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात रमेश यांच्या ऐवजी गोकाकच्या ईराण्णा कडाडी यांना संधी दिली.स्वतंत्र राज्याची मागणीकर्नाटकच्या राजकारणात 'दक्षिण' आणि 'उत्तर' असा वाद पूर्वीपासूनच राहिला आहे. एस.आर.बोम्मई व जगदीश शेट्टर यांचा अपवाद वगळता उत्तर कर्नाटकाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालेली नाही.त्यामुळे उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची मागणी कत्तींनी यापूर्वीच केली आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव