शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सत्तेत आल्यास कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणू  - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 14:50 IST

राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ( 24 नोव्हेंबर ) नेसरी  येथील जाहीर सभेत सांगितले.

कोल्हापूर : राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ( 24 नोव्हेंबर ) नेसरी  येथील जाहीर सभेत सांगितले. तुम्ही कोल्हापूरला सारखे मंत्रिपद मागता, तुमच्या जिल्ह्यात मंत्रिपदाचे एक पार्सल आहे, त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले? अशी विचारणा करत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.

ठाकरे यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा शुक्रवारपासून सुरू झाला. या दोन दिवसांच्या दौ-यात त्यांच्या पाच जाहीर सभा असून मुख्यत: ते शेतकरी, कामगार, उद्योजक अशा घटकांशी बोलणार आहेत. राज्यात ते सत्तेत वाटेकरी आहेत व त्यांचा दौरा मात्र सरकारच्या कारभाराची वाभाडी काढण्यासाठी आहे. कोल्हापूर शहरातही सगळीकडे त्यांचे डिजिटल फलक झळकत आहेत. शुक्रवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात असताना ठाकरे यांच्या दौ-याची हवा निर्माण करण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे.

नेसरीतील सभेला सुमारे दहा हजारांहून जास्त लोक उपस्थित होते. तिथे बोलताना ठाकरे म्हणाले,‘कर्नाटकचा मुख्यमंत्री कानडी आलीच पाहिजे असे म्हणतो परंतू मराठी आलीच पाहिजे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत नाहीत हेच खरे दुर्देव आहे. शिवसेना सीमाभागातील मराठी माणसाच्या मागे कायमच ताकदीने उभी राहिली आहे. ती यापुढेही त्यांना बळ देईल. तुम्ही लोकांनी आज या सभेच्या निमित्ताने चंदगड भगवे करून दाखविले परंतू तेवढ्याने भागणार नाही. शिवसेनेला राज्याची सत्ता द्या. कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही.’

शिवेसेनेचे कोल्हापुरात सहा आमदार आहेत त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिपदाची मागणी होते. मागणी करण्यात गैर नाही परंतू तुमच्या जिल्ह्यात मंत्रिपदाचे एक पार्सल आहे. ते बिनकामाचे आहे. त्यांचा जिल्ह्यासाठी काय उपयोग झाला हे कोल्हापूरकरांनी त्यांना विचारायला हवे, असेही ठाकरे यांनी सुनावले. 

पवार यांच्या गुप्त भेटीबद्दलराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माझी गुप्त भेट झाली. परंतु त्या भेटीबद्दल कुठेच वाच्यता करायची नाही असे ठरले होते.  तरीही पवार यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यता केली. आम्हाला भेटल्यानंतर पवार मुख्यमंत्र्यांनाही भेटले परंतु हा बाबा तिथे तरी शेतक-यांच्या कर्जमाफीबद्दल काहीतरी बोलेल असे वाटले होते, पण ते तिथे बोलले ते एमसीए बद्दल...! 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस