शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मुश्रीफ यांच्या सल्ल्यानेच विधानसभेला उद्धवसेनेत, माजी आमदार के.पी. पाटलांनी केला गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:23 IST

राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘के.पीं’ची फटकेबाजी : पक्षाच्या वर्धापनदिनाला ५ हजार कार्यकर्ते जाणार

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत अडचण आल्याने थोडा बाजूला गेलो होतो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसशी अतूट नाते आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशाच्या आपण बाहेर नाही, त्यांच्या सल्ल्यानेच उद्धवसेनेत गेल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार के.पी. पाटील यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिन मंगळवारी (दि. १०) पुण्यात बालेवाडी स्टेडियमला होत आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते.के.पी. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखे वादळ जिल्ह्यात आहे. हिमालयासारखे ते नेते आहेत, पण ते केवळ मोठे होऊन चालणार नाही, छोट्या छाेट्या कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. आपण सत्तेत आहोत, आमच्या हक्काचा व सन्मानाचा वाटा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा, महायुतीचा झेंडा फडकवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल राहण्यासाठी प्रयत्न करूया. पक्षाच्या वर्धापनदिनाला जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कार पक्षाच्यावतीने करण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, रणजीतसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, जिल्हा बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आदिल फरास, मधुकर जांभळे आदी उपस्थित होते. शीतल फराकटे यांनी आभार मानले.शड्डू ठोकून तयारचएका अपयशाने खचून जायचे नाही, मी सहा निवडणुका लढवल्या. दोन वेळा विजयी झालो, तरीही ९० हजार मताचा गठ्ठा कायम आहे. भाजपने दोन खासदारांच्या बळावर देशात सत्ता मिळवली, त्यामुळे डगमगून जाऊ नका. अजित पवार व हसन मुश्रीफ हे आमच्या आई आहेत, त्यामुळे कोण वाटेल ते अंगावर येऊ दे, आम्ही शड्डू ठोकून तयारच असल्याचे के.पी. पाटील यांनी सांगितले.

‘नविद’नी जादू करावी..आम्ही सगळ्यांनी एकवाक्यतेने ‘नविद’ यांच्यावर ‘गोकुळ’ अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. निवडणुकीला वर्ष राहिले आहे, त्यांनी वर्षात अशी जादू करावी की पुन्हा संघाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यावी, त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागूया, असे आवाहनही के.पी. पाटील यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK P. Patilके. पी. पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना