Types of film corporations in the house of needy sugar directors | गरजुंची साखर संचालकांच्या घरात चित्रपट महामंडळातील प्रकार

गरजुंची साखर संचालकांच्या घरात चित्रपट महामंडळातील प्रकार

ठळक मुद्देगरजुंची साखर संचालकांच्या घरात चित्रपट महामंडळातील प्रकार २ लाखांच्या अपहारात गोवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात गरजू कलावंतांसाठी मिळालेली १७० किलो साखर व तेलाची पाकीटे संचालक रवी गावडे, शरद चव्हाण, अजुर्न नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांच्या घरी पोहोच झाली आहे .मला २ लाखांच्या अपहार प्रकरणात गोवण्यासाठी परस्पर माझ्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी शुक्रवारी पुराव्यानिशी केला आहे. या प्रकरणात अध्यक्षांनी संबंधितांवर कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन उभारु असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पत्रकार परिषदेत त्यांनी मदत म्हणून मिळालेली पण स्वत:च खर्च केलेली रक्कम कुठे मुरवायची यावर झालेली चर्चा, साखर कुणाकुणाच्या घरी कशी पोहोच झाली याचे व्हिडिओ व सीसीटिव्ही फुटेज सादर केले.

ते म्हणाले, मे महिन्यात चित्रपट व्यावसायिकांच्या मदतीसाठी ५०० किलो साखर तसेच तेलाची पाकीटे मिळाली होती. त्यापैकी ३० किलोच्यावर साखर वाटली गेली. उरलेले १७० किलोची पोती व तेलाची पाकीटे महामंडळाच्या कार्यालयात होती. हे साहित्य रवी गावडे, शरद चव्हाण, अजूर्न नलावडे व सुरेंद्र पन्हाळकर यांनी चोरली.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर हलक्या दर्जाच्या साखरेच्या पोती पुन्हा आणून ठेवल्या. शिवाय मदत म्हणून मिळालेल्या १ लाख २० हजार इतक्या रकमेपैकी २५ हजार रुपये जेवणावळीवर उडवले व हिशोबात मुरवण्याचा प्रयत्न केला. यावर कारवाईची मागणी केल्यानंतर अध्यक्षांनी माझयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Types of film corporations in the house of needy sugar directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.