शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कोपार्डेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

कोपार्डे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गावांत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी वेगवेगळ्या ...

कोपार्डे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गावांत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जात आहेत. यात मतदारांना आमिषे दाखविण्याबरोबरच शपथा, भानामतीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. कोपार्डे गावात वेगवेगळ्या चार ठिकाणी असे प्रकार समोर आले. करवीर तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यातील २० गावे संवेदनशील आहेत. यात कोपार्डे, कुडित्रे गावांची नावे आघाडीवर आहेत. काल मध्यरात्री कोपार्डे येथे नदीघाट, स्मशानभूमी, गणपतीचे मंदिर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा चार ठिकाणी उतारे ठेवण्यात आले आहेत. यात एका ठिकाणी चार नारळ व एक काळ्या कापडात बांधलेला नारळ, तर दुसऱ्या ठिकाणी चप्पल, काळ्या बाहुल्या, लिंबू व काळे बिबे ठेवण्यात आले होते. तर तिसऱ्या ठिकाणी दही, भात, कांदा, लिंबू, तर चौथ्या ठिकाणी सर्व प्रकारचे धान्य व त्यामध्ये कणकीचा दिवा लावण्यात आला होता.

आज सकाळी हे ग्रामस्थांच्या ज्या ज्या ठिकाणी निदर्शनास आले, त्यानंतर याची गावभर चर्चा सुरू झाली. लगेचच याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर गावातील नागरिकांनी यावर पाला टाकून पेटवून दिले.

(फोटो) कोपार्डे (ता. करवीर) येथे चार ठिकाणी भानामतीचे केलेले प्रकार.