शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबप खूनप्रकरणी तीन तरुणांच्या मुसक्या आवळल्या, एका अल्पवयीनाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:58 IST

२०२३ मध्ये झालेल्या भांडणातूनच खून केल्याचे स्पष्ट, सोशल मीडियावर खुनाची पोस्ट

पेठवडगाव : अंबप येथील खून प्रकरणात पसार झालेल्या अल्पवयीनांसह दोघा तरुणांना ताब्यात घेतले आहे. संशयितांना २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.यश किरण दाभाडे याचा साेमवारी खून झाला होता. यातील तीन संशयित हर्षद दीपक दाभाडे (वय १९, रा. माळवाडी, अंबप), शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला (वय १९, रा. आनंदनगर, कोडोली) यांच्यासह एका अल्पवयीनास पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत फिर्याद तुषार मनोहर दाभाडे यांनी दिली.हर्षद दाभाडे याचे व मृत यश दाभाडे यांच्यात किरकोळ कारणावरून सप्टेंबर २०२३ ला भांडण झाले होते. यावेळी यश दाभाडे याने हर्षद दाभाडे याच्यावर चाकूने वार केला होता. या कारणावरून यश दाभाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे वय कमी असल्यामुळे त्यावेळी बालसुधारगृहात ठेवले होते. तो काही महिन्यांपूर्वी अंबपला परतला होता.या भांडणाचा राग हर्षद याच्या मनात होता. तो यश याचा बदला घेण्यासाठी संधीची वाट बघत होता.दरम्यान यश वडगाव-अंबप रस्त्यावर गावाजवळ पाण्याच्या टाकी जवळ बसल्याचे त्यांना समजले. या ठिकाणी सायंकाळच्या वेळी अंधार असतो. याचा फायदा घेत हर्षद त्याचे दोन साथीदारांनी अचानक यश दाभाडे याच्यावर हल्ला केला. यावेळी जवळच्या कोयत्याने सपासप वार करून पळून गेले. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास व संशयित ताब्यात घेण्यासाठी दोन पथक नेमले.तपास पथकातील पोलिस अंमलदार हिंदुराव केसरे यांना संशयितांची माहिती मिळाली. हर्षद दाभाडे व त्याचे साथीदार वारणानगर येथील विजय चौकात येणार असल्याचे समजले. त्यांना पकडण्यासाठी त्यांनी सापळा लावला व त्यात ते अडकले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक करीत आहेत.सोशल मीडियावर खुनाची पोस्टमारेकऱ्यांनी यशला मारल्यानंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवर तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से, ३०२ अशी पोस्ट केली होती. तिघांनी एकत्रित फोटो ठेवला होता. यावरून तरुणांत खुन्नस काय असते, याची प्रचिती आली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस