शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोटदुखी, उलट्यांचे कारण; दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू, कोल्हापुरातील संभापूर येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:00 IST

जन्मजातच हृदय कमकुवत

शिरोली : संभापूर (ता. हातकणंगले) येथे पोटदुखी आणि उलट्या झाल्या, तसेच कार्डिओमायोपाथी हा आजार निष्पन्न होऊन हृदयाची क्षमता कमी झाल्याने दोन लहान सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. विराज सागर पोवार (वय ४) आणि वरद सागर पोवार (वय ७) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आणि शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण संभापूर हळहळत आहे.अधिक माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे शेतकरी सागर पोवार हे कुटुंबासह राहतात. आठ दिवसांपूर्वी विराज आणि वरद हे सख्खे भाऊ सांगरूळ (ता. करवीर) येथे मामाच्या गावी सुट्टीला गेले होते. घरातील कामे आटपून आई पूजासुद्धा माहेरी गेल्या होत्या. सोमवारी (दि.१९) हे सर्वजण मामाच्या गावावरून परत आले. मंगळवारी वरद आणि विराज यांच्या पोटात दुखायला लागले, म्हणून त्यांना पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. गुरुवारी पुन्हा पोटात दुखू लागल्याने दोघांनाही पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात नेले असता, तेथे विराजला उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच अवघ्या एका तासात विराजचा मृत्यू झाला. वरदला उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन जा, असे डॉक्टरांनी सांगितले. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी रात्री वरदला उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू झाले. पण, शुक्रवारी सकाळी वरदचाही मृत्यू झाला. विराजचा अहवाल उत्तरीय तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून, त्याच्या रक्ताचे नमुने, अवयव तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत.दोघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की, अनुवंशिक रोगामुळे झाला, हे पंधरा दिवसांनंतर अहवालानंतर आल्यावरच समजणार आहे.दप्तर, वह्यांचीही खरेदीमंगळवारी वरद आणि विराज यांना पेठवडगाव येथील रुग्णालयात उपचार घेऊन दोन्ही मुलांना शाळेचे दप्तर, वह्या, पिशव्या आई-वडिलांनी खरेदी केल्या होत्या. वरद आणि विराज यांना सर्दी, खोकला, ताप, कणकणी असं कोणताही आजार झाला नाही. फक्त पोटात दुखून उलट्या झाल्या आणि हृदयाची क्षमता कमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला आहे.हृदय १२ टक्केच कार्यरतवरदला कोल्हापूर येथील मसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तेव्हा त्याचे हृदय १२ ते १५ टक्के काम करत होते. सर्वसामान्य माणसाचे हृदय हे ६० ते ६५ टक्के काम करते, तसेच वरद पोवारचा इको केल्यावर कार्डीओमायापाथी निष्पन्न झाला आहे, असे डॉ. उदय पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू