उद्यमनगर रोडवर दूचाकीस्वाराला मारहाण करुन लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:40 IST2019-07-24T14:39:35+5:302019-07-24T14:40:47+5:30
जेवण करुन घरी जात असताना पत्नीचा फोन आला म्हणून उद्यमनगर रोडवर दूचाकी थांबवून बोलत असताना दोघाजणांनी मारहाण करुन दहा हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

उद्यमनगर रोडवर दूचाकीस्वाराला मारहाण करुन लुटले
कोल्हापूर : जेवण करुन घरी जात असताना पत्नीचा फोन आला म्हणून उद्यमनगर रोडवर दूचाकी थांबवून बोलत असताना दोघाजणांनी मारहाण करुन दहा हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलीसांनी सांगितले, सुहास प्रकाश मंडलिक (वय ३९, रा. माळी चेंबर्स, मंगळवार पेठ) हे जेवण करुन घरी जात असताना उद्यमनगर रोडवर फोन आल्याने ते थांबले. यावेळी पाठिमागून मोपेडवरुन आलेल्या दोघांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करीत हातातील मोबाईल काढून घेत पलायन केले.
मंडलिक यांनी मंगळवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत. पोलीस निरीक्षक नवनाथ घोघरे तपास करीत आहेत.