चार ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक अज्ञातांनी रोखून हवा सोडून पेटवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 15:58 IST2019-11-21T15:31:06+5:302019-11-21T15:58:25+5:30
आज पहाटे बुवाची वाठार परिसरातील कुंभोज - दानोळी मार्गे अथणी कारखान्यास ऊस वाहतूक करत होते

चार ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक अज्ञातांनी रोखून हवा सोडून पेटवण्याचा प्रयत्न
कोल्हापूर --दानोळी -
कर्नाटक राज्यातील अथणी कारखान्यालस ऊस वाहतूक करत असलेल्या चार ट्रॅक्टर ट्रॉलीची हवा सोडून पेटवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. ही घटना दानोळी येथे जयसिंगपूर मार्गावर आज पहाटे घडली.
बुवाची वाठार परिसरातील कुंभोज - दानोळी मार्गे अथणी कारखान्यास ऊस वाहतूक करत होते. आज पहाटे दानोळी गावाबाहेरील पेट्रोल पंपाजवळ उभा असलेल्या दोन ट्रॅक्टर तसेच शांतिनगर येथून जात असलेल्या चार ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक अज्ञातांनी रोखून हवा सोडली व पेटवण्याचा प्रयत्न केला.