शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मंदिरातील दागिन्यांवर डल्ला मारणारे दोघे अटकेत, सहा गुन्ह्यांची उकल

By उद्धव गोडसे | Updated: March 13, 2024 19:22 IST

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : मंदिरातील दागिने लंपास करणारे आणि धूम स्टाईलने महिलांचे दागिने हिसकावून पळणा-या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केले. मंगळवारी (दि. १२) दुपारी पुणे-बेंगळुरू महामार्गावर पंचगंगा नदीजवळ सापळा रचून ही कारवाई केली.अब्दुल मौला मुल्ला (वय २०) आणि निखिल राजू बागडी (वय २०, दोघे रा. गणेशनगर, रुकडी, ता. हातकणंगले) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दागिने आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पेठ वडगाव आणि शिंगणापूर येथे झालेल्या चेन स्नॅचिंगचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रुकडी येथील सराईत चोरट्यांची माहिती मिळाली होती. संशयित अब्दुल मुल्ला आणि निखिल बागडी हे दोघे पुणे-बेंगळुरू महामार्गावर शिरोली पुलाच्या गावच्या हद्दीतील पीर बालेसाहेब बाबा दर्ग्याजवळ येणार असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचून मंगळवारी दुपारी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.अंगझडतीत त्यांच्याकडे दहा ग्रॅम सोने मिळाले. अधिक चौकशीत त्यांनी पेठ वडगाव, शिंगणापूर आणि लांजा (जि. रत्नागिरी) येथे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याची कबुली दिली. तसेच आकुर्डे, मठगाव (ता. भुदरगड) आणि खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दागिने आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त केली. चोरीचे सहा गुन्हे त्यांनी वर्षभरात केले. दोन्ही संशयितांना पेठ वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्यांच्या चौकशीत आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

यांनी केला तपासपोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक संदीर जाधव, शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, राजू कांबळे, विनोद कांबळे, रामचंद्र कोळी, सतीश जंगम, आदींच्या पथकाने तपास करून संशयितांना अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस