शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोवाड चोरीप्रकरणी दोन पथके राजस्थानला रवाना, बिश्नोई गँगशी संबंध असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:38 IST

चोरट्यांनी विमान प्रवासाची दोन तिकिटे बुक केल्याचीही माहिती

चंदगड : एटीएम फोडून १९ लाख रक्कम लंपास केलेल्या प्रकरणात वापरलेली कार ही राजस्थानची असल्यामुळे त्यानुसार तपासाची चक्रे फिरविण्यास चंदगड पोलिसांनी सुरुवात केली असून, रविवारी रात्रीच दोन पथके राजस्थानच्या दिशेने रवाना झाली आहेत.शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोवाडमधील स्टेट बँकेचे एटीएम फोडून १९ लाख लांबविले. या प्रकरणात पोलिसांच्या व्हॅनला समोरासमोर धडक बसल्याने चोरांच्या कारचा टायर फुटला. त्यामुळे त्यांनी कार हेब्बाळमध्येच सोडून पोबारा केला होता. सदर कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यासंदर्भात अधिक तपास केला असता ती कार राजस्थानमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे स्थानिक तपासाबरोबरच पोलिसांनी आपली मोहीम राजस्थानकडे वळवली आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके त्या दिशेने रवाना झाली आहेत. तसेच घटनेचा राजस्थानमधील बिश्नोई गँगशी संबंध असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीनेही तपास सुरू ठेवल्याचे समजते.

सीसीटीव्हीची गरजकर्यात भागातील ५२ हून अधिक गावांसाठी कोवाड ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. नेहमी वर्दळ असल्याने आर्थिक उलाढालही बाजारपेठेत असते; पण सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्हीची सोय करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्यास स्थानिक व्यापाऱ्यांना अभय मिळू शकत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कारच्या कागदपत्रांवरून चोरट्यांचा सुगावाचोरीनंतर पळून जाणाऱ्या चोरट्यांनी हेब्बाळजवळ कार सोडली. त्यावेळी चोरट्यांनी एका शेतात धाव घेतली. तिथे राखणीला असलेल्या शेतकऱ्याने हटकल्याने चोरट्याकडून कारची कागदपत्रे शेतात पडली. पोलिसांना कारच्या मालकाचे नाव आणि मोबाइल नंबर मिळाला. त्यांनी पोलिसांनी संशयितांची नावे मिळवली.

रेकी करून चोरीकार चोरी करणाऱ्याऱ्यांवर राजस्थानात एटीएम चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यानी स्थानिकांच्या मदतीने एटीएम सेंटरची रेकी केली असावी. जास्त रोकड असल्याची खात्री करून त्यांनी चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

विमानाची दोन तिकिटेचोरट्यांच्या कारमधून पोलिसांना एक मोबाइल मिळाला. त्यावरून केवळ चारच नंबरवर कॉल गेले आहेत. मोबाइलवरून दिल्ली ते मुंबई विमान प्रवासाची दोन तिकिटे बुक केल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस