शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: 'त्या' दोन पोलिसांचे अखेर निलंबन; गुन्हा दाखल न करण्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:39 IST

फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून सात लाख रुपयांची मागणी केली होती.

गोकुळ शिरगाव : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सात लाख रुपयांची लाच मागून चार लाखांवर तडजोड करणाऱ्या गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर अखेर निलंबनाची कारवाई झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कडक प्रशासकीय कारवाई करण्यात आली. यामध्ये इजाज महंमद शेख (पोलिस शिपाई, गोपनीय विभाग – रा. करनूर, ता. कागल), तर दुसरा नितेश मारुती कांबळे (पोलिस हेड कॉन्स्टेबल – रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) मूळ तक्रारदाराविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात एक लेखी तक्रार आली होती. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी इजाज शेख आणि नितेश कांबळे यांनी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून सात लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या तडजोडीत चार लाख रुपये देण्याचे ठरले आणि ही रक्कम दोन दिवसांत देण्यास सांगण्यात आले होते.तक्रारदाराने या प्रकाराची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. एसीबीने केलेल्या पडताळणीत इजाज शेख याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, तसेच या कटात हेड कॉन्स्टेबल नितेश कांबळे याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले. प्रत्येक महिन्याला कारखाने, हॉटेल्स, पान टपऱ्यावर जाऊन हप्ते वसुली करण्याचे काम करीत असल्याचे आता समोर आले आहे.स्वतःच्याच ठाण्यात गुन्हा: विशेष म्हणजे ज्या पोलिस ठाण्यात हे दोघे कार्यरत आहेत, त्याच गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी निलंबनाची कारवाई झाल्यानंतर हे दोन्ही कर्मचारी पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, कर्तव्यात कसूर आणि भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत आज दुपारी त्यांचे निलंबन करण्यात आले. लाचेची मागणी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केल्याने या प्रकरणात अधिक सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Two Gokul Shirgaon Police Suspended for Bribery

Web Summary : Two Gokul Shirgaon police officers suspended for demanding bribe to drop fraud case. They sought ₹7 lakh, settled for ₹4 lakh. Anti-Corruption Bureau filed case, leading to swift suspension. Investigation revealed extortion from local businesses.