शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वीज जोडणीसाठी घेतली पाच हजाराची लाच, महावितरणचे दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:35 IST

इचलकरंजी : चंदूर (ता.हातकणंगले) येथील यंत्रमाग कारखान्यात वीज जोडणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या  महावितरणच्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक ...

इचलकरंजी : चंदूर (ता.हातकणंगले) येथील यंत्रमाग कारखान्यात वीज जोडणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. लाईनमन रज्जाक हुसेन तांबोळी (वय ५०, रा. भारतनगर मिरज) याला रंगेहात पकडले, तर बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश शंकर किटे(३३, रा.धुळेश्वरनगर कबनूर) याला गुन्ह्यातील सहभागाबद्दल ताब्यात घेतले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला.चंदूर येथील शाहूनगरमध्ये हकीब पानारी हे यंत्रमाग कारखाना सुरू करणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावतीने एका इलेक्ट्रिक ठेकेदाराने महावितरण कंपनीच्या चंदूर कार्यालयात वीज जोडणी मागणीचा अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून २६ अश्वशक्तीची जोडणी मंजूर करून घेतली. त्यासाठी आवश्यक असणारी इलेक्ट्रिकल पेटी, मीटर, आदींची जोडणी करण्यात आली. परंतु आर्थिक तडजोडीसाठी खांबावरून वीज जोडणी देणे बाकी राहिले होते.यासंदर्भात ३० ऑक्टोबरला तक्रारदाराने चंदूर कार्यालयातील लाईनमन तांबोळी याची भेट घेतली. त्यावेळी त्याच्यावतीने किटे याने तक्रारदारास वीज जोडणी देण्यासाठी तांबोळी याच्यासाठी सात हजार रुपये द्यावे लागतील; अन्यथा जोडणी मिळणार नाही, असे सांगितले. त्यावेळी तक्रारदाराने तडजोड करण्याची मागणी केली. त्यामुळे तांबोळी याने पाच हजार रुपये द्या. लगेच जोडून देतो, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्या तक्रारीची पडताळणी केली असता तांबोळी याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये स्वीकारताना रज्जाक तांबोळी याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय चव्हाण, सुनील घोसाळकर, सुधीर पाटील, कृष्णा पाटील, गजानन कुराडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणmahavitaranमहावितरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी