साहाय्यक फौजदारासह दोन कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:22 IST2020-03-06T16:20:25+5:302020-03-06T16:22:40+5:30

गडहिंग्लज येथील ‘मोक्का’तील आरोपी पलायन प्रकरणी साहाय्यक फौजदार भारत बारटक्के, कॉन्स्टेबल अनिल बाबासाहेब पाटील, महिला शिपाई वर्षा श्रीकांत बागडी यांना गुरुवारी (दि. ५) रात्री उशिरा निलंबित करण्यात आले.

Two personnel suspended along with auxiliary troops | साहाय्यक फौजदारासह दोन कर्मचारी निलंबित

साहाय्यक फौजदारासह दोन कर्मचारी निलंबित

ठळक मुद्देसाहाय्यक फौजदारासह दोन कर्मचारी निलंबित‘मोक्का’तील आरोपी पलायन प्रकरण

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील ‘मोक्का’तील आरोपी पलायन प्रकरणी साहाय्यक फौजदार भारत बारटक्के, कॉन्स्टेबल अनिल बाबासाहेब पाटील, महिला शिपाई वर्षा श्रीकांत बागडी यांना गुरुवारी (दि. ५) रात्री उशिरा निलंबित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही कारवाई केली. श्रीधर अर्जुन शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) या ‘मोक्का’तील आरोपीने गडहिंग्लज येथील न्यायालयाच्या परिसरातून पलायन केले. यामध्ये हलगर्जीपणा केल्यावरून संबंधितांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
 

 

Web Title: Two personnel suspended along with auxiliary troops