शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: मॉर्निंग वॉक जीवावर बेतले, अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 14:25 IST

वडगाव आष्टा रोडवर झाला अपघात

नाना जाधव

भादोले : अज्ञात वाहनाच्या धडकेत फिरायला गेलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. शालन बाळू वडडर (वय ७० रा. कुळरप ता. वाळवा), दिलीप विठ्ठल पाटील (५८ रा. भादोले) अशी मृतांची नावे आहेत. भादोले नजीक मसोबा फाटा जवळ आज, बुधवारी (दि.१२) पहाटे पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, वडगाव-भादोले रस्त्यावर मसोबावाडी फाट्या नजिक अज्ञात चार चाकी वाहन चालक आष्टाकडे निघाला होता. तर वडगाव कडून फिरून परत भादोले गावाकडे दोघेजण स्वतंत्रपणे जात होते. यावेळी कार चालकाने प्रथम वड्डर यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. तर काही अंतरावरच पुढे दिलीप पाटील यांना याच कारने धडक दिली. यावेळी पाटील यांच्या छातीवरून कारचे चाक गेल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. शालन वड्डर या माहेरी यात्रेसाठी आल्या होत्या. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. तर दिलीप हे साखर कारखान्यात नोकरीस होते. मृतदेहाची उत्तरीय तपासणी भादोले येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या दुर्दैवी अपघातानंतर भादोले गावावर शोककळा पसरली.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत गणपती मोतीराम पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू