Kolhapur: कळपातील वर्चस्ववाद, गव्यांची निकराची झुंज; पावनगडावर थरार, जंगल मित्राच्या कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:51 IST2025-06-21T19:49:39+5:302025-06-21T19:51:13+5:30
पन्हाळा: कळपातील वर्चस्ववादातून सुरु असलेल्या दोन नर गव्यांच्या निकराच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. पन्हाळगडावरील पावनगडाकडे जाताना रेडेघाट गवती कुरणात ...

Kolhapur: कळपातील वर्चस्ववाद, गव्यांची निकराची झुंज; पावनगडावर थरार, जंगल मित्राच्या कॅमेऱ्यात कैद
पन्हाळा: कळपातील वर्चस्ववादातून सुरु असलेल्या दोन नर गव्यांच्या निकराच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. पन्हाळगडावरील पावनगडाकडे जाताना रेडेघाट गवती कुरणात आज, शनिवारी दुपारी जंगल मित्र शादाब शेख याने या झुंजीचा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
पावनगड परिसरात गव्यांचा अधिवास वाढला आहे. मुबलक चारा आणि बारमाही पाणी यामुळे पावनगड क्षेत्रात भरपूर वन्यप्राणी पाहायला मिळतात. भेकर, साळींदर, अजगर, बिबट्या या प्राण्यांबरोबरच विविध पक्षीही दिसतात. याठिकाणी पक्षी मित्र, प्राणी मित्र नेहमी छायाचित्रणासाठी येतात.
कळपातील वर्चस्ववाद
यापरिसरात साधारण तीस ते चाळीस गवे कळपाने रेडेघाट गवती कुरणात आपला अधिवास करून राहतात. गव्यांच्या कळपात एक नर व बाकी सर्व माद्या असतात. यात एखादा नर गवा लहानाचा मोठा झाला तर त्यांच्यात वर्चस्व वाद सुरु होतो. यातूनच दोन गव्यांच्यात झुंज सुरु होती. जंगल मित्र शादाब याने हा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
कोल्हापूर : पन्हाळगडावरील पावनगड येथे गव्यांच्या झुंजीचा थरार, जंगल मित्राच्या कॅमेऱ्यात कैद #Kolhapurpic.twitter.com/Wdst8Hb2AE
— Lokmat (@lokmat) June 21, 2025