शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 17:00 IST

बेळगाव : आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवापूरहून बेळगावकडे निघालेल्या कारची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक झाली. याच दरम्यान अपघाती कारला पाठीमागून ...

बेळगाव : आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवापूरहून बेळगावकडे निघालेल्या कारची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक झाली. याच दरम्यान अपघाती कारला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरची भीषण धडक झाली. या तिहेरी अपघातात दोघे जागीच ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. या भीषण धडकेत कारचा चक्काचूर झाला. होनगा नजीक बेन्नाळी पुलावर ही घटना घडली. ठार झालेल्या दोघांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव पांडुरंग मारुती जाधव (वय 60 वर्षे, रा. कोल्हापूर) असे आहे. दुसऱ्या मृताचे नाव समजू शकले नाही. गंभीर जखमीला उपचारासाठी बेळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कारमधील सर्वजण बेळगावात विश्व हिंदू परिषदेच्या धर्मांतर बंदी कायदा रद्द विरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून निघाले होते. दरम्यान होनगा नजीक बेन्नाळी पुलावर कारची कंटेनरला पाठीमागून धडक झाली. याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरची कारला जोराची धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.  अपघाताची माहिती मिळताच काकतीचे ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिन्नूर यांनी पोलिस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले. सदर अपघाताची काकती पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यू