केर्ली ते नांदारी रस्त्यासाठी दोनशे पाच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:59+5:302020-12-24T04:21:59+5:30
करंजफेण : पन्हाळा शाहुवाडीचे आमदार डाॅ. विनय कोरे यांनी अनेक वर्षांपासून निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या केर्ली (कोतोली फाटा) ते नांदगाव ...

केर्ली ते नांदारी रस्त्यासाठी दोनशे पाच कोटींचा निधी
करंजफेण : पन्हाळा शाहुवाडीचे आमदार डाॅ. विनय कोरे यांनी अनेक वर्षांपासून निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या केर्ली (कोतोली फाटा) ते नांदगाव - नांदारी ३० किलोमीटर मुख्य वाहतुकीच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी ए. डी. बी. योजनेतून २०५ कोटीचा निधी मंजूर केला असल्याचे जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच पन्हाळा - शाहुवाडी मतदार संघातील गाव वाडी वस्तीवरील रस्त्यासाठी २ कोटी ७६ लाखाचा निधी मंजूर केला असल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये नांदगाव - सोनुर्ले पाटीलवाडी रस्त्यासाठी ४९.४० लाख, गाडेवाडी - शिरगाव रस्त्यासाठी ५५.७० लाख, शेंबवणे रस्त्यासाठी ५२.८८ लाख, शाहुवाडी - ओकोली - शिराळे रस्त्यासाठी ६४.७६ लाख, सोनवडे - परखंदळे रस्त्यासाठी ३० लाख, करंजफेण - बांदिवडे रस्त्यासाठी २५ लाख निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधित रस्ते अनेक दिवसांपासून खराब झाले होते. निधी मंजूर झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे, रणजितसिंह शिंदे,प न्हाळा पंचायत समितीचे उपसभापती रश्मी कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर, पृथ्वीराज सरनोबत, संजय माने, युवराज गायकवाड, भरत घाटगे, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.