बिर्याणीच्या पैसे देवघेवीतून दोन गटांत हाणामारी : बाटली डोक्यात फोडल्याने दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:40 AM2020-11-13T11:40:01+5:302020-11-13T11:41:14+5:30

Crimenews, police, kolhapurnews बिर्याणीचे पैसे देण्यावरून वाद उद‌्भवून गांधी मैदानासमोर दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला. या हल्ल्यात बिअरची बाटली डोक्यात फोडल्याने दोघे युवक जखमी झाले. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन्हीही गटांकडून परस्‍परविरोधी गुन्‍हे दाखल केले.

Two groups fight over biryani money: Two injured after bottle blows to head | बिर्याणीच्या पैसे देवघेवीतून दोन गटांत हाणामारी : बाटली डोक्यात फोडल्याने दोघे जखमी

बिर्याणीच्या पैसे देवघेवीतून दोन गटांत हाणामारी : बाटली डोक्यात फोडल्याने दोघे जखमी

Next
ठळक मुद्देबिर्याणीच्या पैसे देवघेवीतून दोन गटांत हाणामारी : बाटली डोक्यात फोडल्याने दोघे जखमी गांधी मैदान परिसरातील घटना : बाटली डोक्यात फोडल्याने दोघे जखमी

कोल्हापूर : बिर्याणीचे पैसे देण्यावरून वाद उद‌्भवून गांधी मैदानासमोर दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला. या हल्ल्यात बिअरची बाटली डोक्यात फोडल्याने दोघे युवक जखमी झाले. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन्हीही गटांकडून परस्‍परविरोधी गुन्‍हे दाखल केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहित माने, अतुल खडके, सिद्धार्थ पाटील हे बिर्याणी आणण्‍यासाठी गांधी मैदानाजवळील बबलू चव्‍हाण याच्‍याकडे गेले होते. बिर्याणीच्‍या पैशावरून चव्‍हाण याच्‍यासोबत त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, रागाच्या भरात बबलू, अभिषेक भोसले व ओंकार माळी या तिघांनी रोहित मानेला बेदम मारहाण केली.

या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत तिघांवर गुन्‍हा दाखल केला. ओंकार माळी याने दिलेल्‍या तक्रारीनुसार अतुल खडके, रोहित माने व सिद्धार्थ पाटील या तिघांनी एकमेकांकडे बघण्‍याच्‍या कारणावरून बिअरच्‍या बाटलीने मारहाण केल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे.

Web Title: Two groups fight over biryani money: Two injured after bottle blows to head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.