शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील वारे वसाहतीत दोन गटात सशस्त्र राडा, चौघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 17:39 IST

हल्लेखोरांनी तलवार गुप्ती, एडका, काठ्या आदी प्राणघातक हत्यारांचा खुलेआम वापर करत दहशत माजवली

कोल्हापूर : संभाजीनगर परिसरातील वारे वसाहतमधे दोन गटात झालेल्या सशस्त्र राड्यात चार जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. सुमारे एक तासभर हा राडा सुरू होता. हल्लेखोरांनी तलवार गुप्ती, एडका, काठ्या आदी प्राणघातक हत्यारांचा खुलेआम वापर करत दहशत माजवली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पृथ्वी विलास आवळे (वय 20), सुजल कांबळे (21), दादासो किशोर माने (30) रूपाली विलास सावळे (४०, सर्व रा.वारे वसाहत, संभाजी नगर कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी पृथ्वी आवळे याच्या पाठीत धारदार शस्त्राचे खोलवर वार झाल्याने तो अत्यवस्थ आहे. त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, चार दिवसापूर्वी एका कॉलेजवर ट्रेडिशनल डे साजरा झाला. यावेळी तेथे साऊंड सिस्टिम लावण्यावरून वारे वसाहतीतील दोन गटाच्या युवकात वादावादी झाली होती. या घटनेचे पडसाद आज, शनिवारी दुपारी वारे वसाहत मध्ये उमटले. एका गटाच्या पंधरा ते वीस जणांनी हातात तलवारी सारखी धारदार शस्त्रे घेऊन संजय आवळे यांच्या घरावर हल्ला केला. घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड करून पृथ्वी आवळे या युवकाला भोसकले. युवकांनी परिसरात प्रचंड गोंधळ घालत दहशतीचे वातावरण केले.  

यावेळी आवळे गटातील समर्थक एकत्र आले. त्यानंतर दोन्ही गटात सशस्त्र राडा झाला. सुमारे तासभर हा राडा सुरू होता. हल्यात दोन्ही गटांतील महिलांचाही मोठ्या संख्येने समावेश होता. या हल्ल्यात चार जण जखमी झाले. सुजल आवळे व पृथ्वी आवळे यांना खोलवर जखमा झाल्या. घटनेनंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी जखमींना सीपीआरमध्ये रकतबंबाळ अवस्थेत दाखल केले. त्यावेळी सीपीआर मध्येही दोन्ही समोरासमोर आले. त्यातून तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

पोलीस फौजी आवारात अगोदर हजर असल्याने त्यांनी दोन्ही गटाच्या समर्थकांना पिटाळून लावले. काही वेळानंतर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक संतोष जाधव हे घटनास्थळी आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस