शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
2
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
3
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
4
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
5
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
6
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
7
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
8
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
9
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
10
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
11
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
12
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
13
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
14
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
15
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
16
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
17
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
18
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
19
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
20
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
Daily Top 2Weekly Top 5

धरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने राधानगरीचे दोन दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:55 IST

कोल्हापूर जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा सुरुवात केली. दिवसभर एकसारखी रिपरिप राहिली असून धरण क्षेत्रातही पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे अगोदरच संथगतीने उतरणारे पुराचे पाणी पुन्हा स्थिर होऊ लागले आहे.

ठळक मुद्देधरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने राधानगरीचे दोन दरवाजे खुलेकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा सुरुवात केली. दिवसभर एकसारखी रिपरिप राहिली असून धरण क्षेत्रातही पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे अगोदरच संथगतीने उतरणारे पुराचे पाणी पुन्हा स्थिर होऊ लागले आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्यात धुवाधार पावसाने महापूर आणला होता. मात्र, शुक्रवार(दि. ७)पासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पुराचे पाणी ओसरू लागले. तीन-चार दिवस खडखडीत उघडीप दिल्याने नद्यांची पाणी पातळी हळू-हळू कमी होत गेली. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे.

दिवसभर एकसारखी रिपरिप सुरू आहे. धरणक्षेत्रातही पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाचे क्रमांक ३ व ६ हे स्वयंचलित दरवाजे खुले होऊन त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दूधगंगा धरण ८६.६५ टक्के भरले असून त्यातून १८०० तर वारणा धरण ८५.९१ टक्के भरल्याने २५१७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अद्याप ४७ बंधारे व ५८ मार्ग बंद असल्याने वाहतूक विस्कळीत आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरणkolhapurकोल्हापूर