शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 18:01 IST

पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : शहर परिसरात गेली दोन दिवस उघडीप दिली असली तरी जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसतच आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या धारा सुरुच असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरीधरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने काल, बुधवार पासून धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. काल राधानगरीचे चार दरवाजे उघडले होते यातील दोन दरवाजे बंद झाले. मात्र, पुन्हा आज दोन दरवाजे खुले झाले. काही वेळातच पाचवा दरवाजाही खुला झाल्याने धरणातून 8740 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. परिणामी पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे.पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज, सायंकाळी पंचगंगेची पातळी ४१ फूट ८ इंच इतकी झाली असून धोक्याच्या पातळीच्या (43 फूट) दिशेने वाटचाल सुरू आहे. पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्याआधीच काल, बुधवार पासून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू केले आहे. आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे आदी गावांमधील हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सध्या पंचगंगा नदीवरील 73 बंधारे पाण्याखाली आहेत.कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद  वादळी पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील केर्ली जवळील यश हॅाटेल शेजारी वादळी वडाचे झाड रात्री उन्मळून पडले. या मार्गावर पुराचे पाणी आल्याने प्रशासनाने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद केल्यामुळे वाहतुकीची कोडी झाली नाही.उघडीप असली तरी पातळी स्थिर राहणारराधानगरी धरणाचे दरवाजे खुले झाले तर ते पाणी पंचगंगेपर्यंत येण्यासाठी किमान आठ तास लागतात. त्यामुळे पावसाने उघडीप दिली तरी पंचगंगेची पातळी स्थिर राहणार आहे.

चिखली, आंबेवाडीतील 500 कुटुंबे स्थलांतरित

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली व आंबेवाडी गावात अद्याप पुराचे पाणी आले नसले तरी दक्षता बाळगत जिल्हा प्रशासनाने दोन्ही गावांतील जवळपास 500 कुटुंबे सुरक्षितस्थळी स्थलांतरित केली आहेत.

कोल्हापूर-केर्ली मार्गावर पाणी

कोल्हापूर ते केर्ली दरम्यानच्या रस्त्यावर दीड फुट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक जोतिबामार्गे वळवण्यात आली आहे.

एसटीचे हे मार्ग बंद -कोल्हापूर ते गगनबावडाइचलकरंजी ते कुरुंदवाडगडहिंग्लज ते ऐनापूरमलकापूर ते शित्तूरचंदगड ते दोडामार्गगगनबावडा ते करुळ घाटआजरा ते देव कांडगाव

काल, बुधवारी राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे असे उघडत गेलेपहाटे 5.30 वाजता - गेट क्रमांक 6सकाळी 8.55 वाजता - गेट क्रमांक 5दुपारी 2.20 वाजता - गेट क्रमांक 3दुपारी 3.20 वाजता - गेट क्रमांक 4

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणKolhapur Floodकोल्हापूर पूरradhanagari-acराधानगरी