सिगारेट व पान देण्यावरुन राजेंद्रनगरमध्ये दोन कुटुंबात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 13:39 IST2019-05-28T13:38:34+5:302019-05-28T13:39:40+5:30
राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे सिगारेट व पान उदार मागितलेच्या कारणातुन दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले. संजय कुंडलिक गोरे (वय ३५, रा. भवानी मंडप, कोल्हापूर), उषा दत्तात्रय कल्याणकर (४०, रा. राजेंद्रनगर) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांनी एकमेकाच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

सिगारेट व पान देण्यावरुन राजेंद्रनगरमध्ये दोन कुटुंबात हाणामारी
कोल्हापूर : राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे सिगारेट व पान उदार मागितलेच्या कारणातुन दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले. संजय कुंडलिक गोरे (वय ३५, रा. भवानी मंडप, कोल्हापूर), उषा दत्तात्रय कल्याणकर (४०, रा. राजेंद्रनगर) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांनी एकमेकाच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीसांनी सांगितले, राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे उषा कल्याणकर यांची पानटपरी आहे. याठिकाणी संजय गोरे हा नेहमी येत असतो. सोमवारी त्याने टपरीवर येवून कल्याणकर यांचेकडे सिगारेट व पान उदार मागितले. त्यांनी उदार देण्यास नकार दिला. त्यातुन या दोघांच्यात वादावादी झाली.
यावेळी नितीन कोरवी याठिकाणी आला. त्याने व कल्याणकर यांनी गोरे यांना मारहाण केली. गोरे यांनीही हातुडीने दोघांना मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.