‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी लोकाग्रहास्तव दोन दिवसांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:36 IST2019-12-25T17:28:32+5:302019-12-25T17:36:21+5:30
रांगड्या कोल्हापुरात गेल्या दोन वर्षांपासून ‘सुदृढ आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत कोल्हापुरात रविवार, दि. ५ जानेवारी २०२० रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व होत आहे. त्यात सहभागी होण्याकरिता नावनोंदणीसाठी कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी करण्यासाठी लोकाग्रहास्तव दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे ; त्यामुळे ‘आता नाही तर कधी नाही’ अशी परिस्थिती उद्भवू नये, याकरिता नोंदणीसाठी त्वरा करा.

पश्चिम महाराष्ट्रातील जाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज अॅँड मीडिया असोसिएशन (आसमा)चे सर्व सदस्य ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी होऊन धावणार आहेत. यामध्ये संपर्क अॅडव्हर्टायझिंगचे मोहन कुलकर्णी, ‘अॅड फाईन’चे अमरदीप पाटील, आयमॅक्स अॅडव्हर्टायझिंगचे सुनील बासराणी, अभय पब्लिसिटीचे अभय मिराशी, लुकतुके पब्लिसिटीचे सुहास लुकतुके, ‘ग्रॅव्हिटी’चे विवेक मंदु्रपकर, इम्प्रेशन पब्लिसिटीचे सुनील बनगे, इंटरट्रेड अॅडव्हर्टायझर्सचे अस्लम देवळे, अमर पब्लिसिटीचे प्रकाश पवार, विश्व अॅडव्हर्टायझर्सचे अविनाश पेंडुरकर, ब्रँडशेप अॅडव्हर्टायझर्सचे अमरसिंह भोसले उपस्थित होते.
कोल्हापूर : रांगड्या कोल्हापुरात गेल्या दोन वर्षांपासून ‘सुदृढ आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत कोल्हापुरात रविवार, दि. ५ जानेवारी २०२० रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व होत आहे. त्यात सहभागी होण्याकरिता नावनोंदणीसाठी कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी करण्यासाठी लोकाग्रहास्तव दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे ; त्यामुळे ‘आता नाही तर कधी नाही’ अशी परिस्थिती उद्भवू नये, याकरिता नोंदणीसाठी त्वरा करा.
कोल्हापूरची नवी ओळख असणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन,’ १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल.
सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºयांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. धावपटू आणि नागरिकांना नावनोंदणी करता येणार आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
धावपटूंना मिळणार रंगीत मेडल
या महामॅरेथॉनमध्ये वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना सहभागी होता येईल. विविध पाच गटांमध्ये होणाºया मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यंदाच्या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य असून, त्यामध्ये सहभागी होणाºया प्रत्येक धावपटूला आकर्षक आणि रंगीत मेडल मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा.
प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य
- ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट