शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ उद्यापासून कोल्हापुरात; स्वामी अभिषेक ब्रम्हचारी यांची उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:12 IST

ललितास्त्रनामची १ कोटी आवर्तने

कोल्हापूर : त्रिपूरसुंदरी श्री ललितामाता चे उपासक, यज्ञसम्राट स्वामी अभिषेक ब्रम्हचारी यांच्या पवित्र सानिध्यात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात प्रथमच शुक्रवार (दि.२०) व शनिवारी (दि.२१) श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ होणार आहे. आयटी पार्क येथील विश्वपंढरी येथे सकाळी ९ वाजल्यापासून या महायज्ञाला सुरुवात होईल. यात श्री ललितासहस्त्रनामाची एक कोटीहून अधिक आवर्तने व कुंकूमार्चन विधी होणार असून शहरातील महिला, मुली सहभागी होणार आहेत.अध्यात्म ही भारताला लाभलेली अलाौकिक देणगी आहे. देवादिकांची उपासना, मंत्रोच्चार, महायज्ञ अशा धार्मिक विधींनी आपल्याभोवती कायम दैवी शक्तींचे सकारात्मक उर्जा अस्तित्व जाणवते. स्वामी अभिषेक ब्रम्हचारी म्हणजे याच अध्यात्मिक परंपरेचे वाहक, श्री ललितामातेचे उपासक, अध्यात्मातून देशाची प्रगती, विश्वशांती, गरीबांचे कल्याण व्हावे या उद्देशातून त्यांनी देशभरात कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत ४२ ठिकाणी श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ केले असून त्या माध्यातून १२० कोटी वेळा श्री ललितासहस्त्रानामची आवर्तने झाली आहेत. याआधी महाराष्ट्रात मुंबईत तीन वेळा हे महायज्ञ झाले असून आता काेल्हापुरात चौथे यज्ञ होत आहे.त्यासाठी काशीहून ७ ते ८ उच्चविद्याविभूषित वेदमूर्ती येत आहेत. स्वामी अभिषेक ब्रम्हचारी हे ऋषी व कृषी परंपरा नव्या पिढीत रुजावी, त्यांना श्री विद्या सनातन धर्माचे ज्ञान मिळावे, पौराणिक शिक्षण परंपरा समजून घ्यावी, राष्ट्र निर्माणासाठी युवा पिढीने सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्नशिल आहेत. वंचित लहान मुलांचे शिक्षण, महिला सबलीकरणाचेही कार्य ते करत आहेत. गोमाता संरक्षणासाठीच्या अभियानात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. कोल्हापुरात या महायज्ञाचे संयोजन जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी हे करत आहेत. सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत कुुंकूमार्चन महायज्ञ व त्यानंतर विविध प्रकारचे पूजन, उपासना, सेवा, भजन असे धार्मिक उपक्रम होणार आहेत. महिला, युवतींना या महायज्ञात निशुल्क प्रवेश असून त्यांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shri Vidyakoti Kunkumarchan Mahayagya in Kolhapur from tomorrow; Swami Abhishek present.

Web Summary : Kolhapur to host Shri Vidyakoti Kunkumarchan Mahayagya led by Swami Abhishek Brahmachari. The event features Lalita Sahasranama recitations and aims for global peace and women empowerment. It will be held at IT Park's Vishwa Pandhari.