घरफोडी करणाऱ्या दोन चोरटयाना अटक, सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 02:39 PM2020-09-29T14:39:04+5:302020-09-29T14:43:35+5:30

कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या दोन चोरट्यांना जयसिंगपूर ते कोल्हापूर या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी विभागाच्या पोलिसानी ताब्यात घेतले. त्याचे कडून सुमारे २४ तोळे सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Two burglars arrested for burglary, 10 weights of gold | घरफोडी करणाऱ्या दोन चोरटयाना अटक, सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणाऱ्या दोन चोरटयाना अटक, सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देघरफोडी करणाऱ्या दोन चोरटयाना अटक २४ तोळे सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त

कोडोली -कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या दोन चोरट्यांना जयसिंगपूर ते कोल्हापूर या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी विभागाच्या पोलिसानी ताब्यात घेतले. त्याचे कडून सुमारे २४ तोळे सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कस्टडी देणेत आली आहे. संतोष सिध्दू पुजारी (वय ३५, रा. वडणगे ता.करवीर)  व राहुल उत्तम देवकर (वय २४, रा. मांगले ता. शिराळा, जि.सांगली) अशी आरोपींची नावे आहेत.

दि २६ सप्टेंबर २० रोजी हे दोघेजण जयसिंगपूर ते कोल्हापूर या मार्गावरून दोन चाकी गाडीवरून चोरीचे सोन्याचे दागिने घेवून विक्री साठी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. इंचलकरंजी विभागाचे सपोनि विकास जाधव यांनी सापळा रचून आरोपी पुजारी व देवकर यांना ताब्यात घेतली. त्यांची सखोल अगझडती घेतले असता त्यांच्याकडे ९ तोळे सोने, दोन मोटारसायकल व दोन मोबाईल असा ४ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल सापडला. 

या दोघांना पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखले व वारणानगर येथे दोन घरफोडी केल्याचे कबुल केले. चोरट्याने केलेले गुन्हे कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांना कोडोली पोलिसाच्या ताब्यात देणेत आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे.

आरोपीच्या कडे संयुक्तपणे तपास केला असता त्यांच्याकडून दाखल असलेल्या दोन घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील उर्वरीत मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. संशयित आरोपींच्याकडून चोरीतील चोवीस तोळे सोने व इतर मुद्देमाल असा एकूण १० लाख ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयित आरोपी संतोष पुजारी यांचेवर या पूर्वी दरोडा, घरफोडी मोटार सायकल चोरी असे विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी इचलकरंजीचे सपोनि विकास जाधव, कोडोलीचे सपोनि सुरज बनसोडे, उप निरीक्षक नरेन्द्र पाटील, फौजदार खंडेराव कोळी, महेश खोत, विश्वास चिली आदीने काम पाहिले.

Web Title: Two burglars arrested for burglary, 10 weights of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.