दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:31 IST2020-09-22T19:31:08+5:302020-09-22T19:31:54+5:30
दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आर. के. नगर ते भारती विद्यापीठ रस्त्यावर बेघर वसाहतीनजीक घडली. सर्वेश मुरलीधर कुलकर्णी (वय २१, रा. स्वामी समर्थनगर, बाबा जरगनगर) व शुभम राजकुमार माने (२१, रा. म्हसवडे, ता. माण, जि. सातारा) अशी जखमींची नावे आहेत.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे युवक जखमी
कोल्हापूर : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आर. के. नगर ते भारती विद्यापीठ रस्त्यावर बेघर वसाहतीनजीक घडली. सर्वेश मुरलीधर कुलकर्णी (वय २१, रा. स्वामी समर्थनगर, बाबा जरगनगर) व शुभम राजकुमार माने (२१, रा. म्हसवडे, ता. माण, जि. सातारा) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रसाद विलास कांबळे (वय २१, रा. वाघुर्डे ता. पन्हाळा) हा निष्काळजीपणे व भरधाव वेगाने दुचाकी चालवून समोरील मोटारीस ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीशी त्याची जोरदार धडक झाली.
या अपघातात दुचाकीस्वार सर्वेश कुलकर्णी व शुभम माने हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत दुचाकीचालक प्रसाद कांबळे याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.