शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जिल्हाधिकारी, अधिष्ठातांच्या सह्या करुन काढले बोगस आदेश; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 11:59 IST

कोल्हापूर : येथील सीपीआरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे उकळणाऱ्या आणि जिल्हाधिकारी , अधिष्ठाता यांच्या खोट्या सह्या करून ...

कोल्हापूर : येथील सीपीआरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे उकळणाऱ्या आणि जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांच्या खोट्या सह्या करून बोगस आदेश देणाऱ्या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. नितीन अशोक कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) आणि नागेश एकनाथ कांबळे (रा. शेळेवाडी, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याबाबतच्या तपासात गांभीर्य नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केले होते.या दोघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३३६ (३), ३३७, ३३९, ३(५) नुसार फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे, या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या दोघांनी संगनमत करून गायत्री जयवंत बारके व दिलीप गणपती दावणे यांच्याकडून सीपीआरमध्ये लिपिक / शिपाई पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. त्यांनी तगादा लावल्यानंतर या दोघांनी आयुक्त, जिल्हा विभाग रुग्णालय, कोल्हापूर यांना शिफारस केल्याचे बोगस पत्र तयार केले आणि त्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या खोट्या सह्या केल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष कांबळे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, खंडेराव गायकवाड, गजानन परीट, प्रीतम मिठारी, मंगेश माने, किशोर पवार यांनी ही कारवाई केली.

पंधरा दिवसांनंतर कारवाईपोलिस ठाण्यात तक्रार देऊन १५ दिवस झाले तरी तपास होत नव्हता. कागदपत्रांचे कारण पोलिस ठाणे आणि सीपीआरकडून सांगण्यात येत होते. यावर ‘लोकमत’ने तपासात गांभीर्य नसल्याचे वृत्त गुरुवारी प्रकाशित केल्यानंतर शुक्रवारीच पोलिसांनी दोघांना अटक केली.

फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधा..या आरोपींकडून सीपीआरमध्ये नोकरी लावतो म्हणून पैसे घेऊन कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तातडीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयcollectorजिल्हाधिकारी