साखरेतून दुधात येण्यास अडीच डझन इच्छुक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:50+5:302021-04-05T04:21:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. इतर जिल्हास्तरीय संस्थांत पदे भोगलेल्यांनाही ‘गोकुळ’च्या ...

साखरेतून दुधात येण्यास अडीच डझन इच्छुक !
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. इतर जिल्हास्तरीय संस्थांत पदे भोगलेल्यांनाही ‘गोकुळ’च्या दुधाचा गोडवा लागला आहे. यामध्ये मग साखर कारखान्याचे पदाधिकारी तरी मागे का राहतील? दूध आणि साखरेचे अतूट नाते असल्याने या निवडणुकीत साखर कारखान्याचे आजी-माजी तब्बल अडीच डझन पदाधिकारी इच्छुक आहेत.
‘गोकुळ’च्या दुधाने अनेकांना भुरळ पाडली आहे. कोल्हापूरच्या मातीतच कसदारपणा असल्याने येथील शेतीमाल, साखरेसह दुधाला वेगळीच चव आहे. त्यामुळे येथील प्रत्येक उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळते. ‘गोकुळ’च्या दुधाचा गोडवा काही न्याराच आहे. त्यातून मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा बँकेचे संचालक, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यात जावसे वाटते. मग साखर कारखान्याचे पदाधिकारी मागे का राहतील? त्यात दूध आणि साखरेचे अतूट नाते असल्याने या निवडणुकीत साखर कारखान्यांच्या ३० हून अधिक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
यामध्ये ‘बिद्री’, ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘गडहिंग्लज’, ‘आजरा,’ आदी साखर कारखान्यांच्या आजी व माजी संचालकांचा समावेश आहे.
‘धुंदरे’, ‘खाडे’ विश्वास पाटीलच संचालक
साखर कारखान्यांचे तिघे पदाधिकारी विद्यमान संचालक मंडळात आहेत. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील हे ‘कुंभी’चे अध्यक्ष, तर बाळासाहेब खाडे हे संचालक होते; तर पी. डी. धुंदरे यांनी ‘भोगावती’चे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.