शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

वीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:41 IST

Dam Kolhapur : वीस वर्षापूर्वी ज्या २७ कुटुंबीयांची जमीन केळोशी प्रकल्पात गेली असे २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त 'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन' म्हणत आर्त हाक देत आहेत .

ठळक मुद्देवीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

श्रीकांत ऱ्हायकरधामोड  : गेल्या वीस वर्षापूर्वी ज्या २७ कुटुंबीयांनी धरणासाठी स्वतःची शेती गावाला बहाल केली. त्या 'बैलगोंड ' ओढयावर आज लोंढा - नाला प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. किरकोळ कामे वगळता धरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सद्या काम बंद असले तरी गेल्या चार वर्षापासून या प्रकल्पात पाणी अडवून त्याचा गावकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी वापर करायला सुरवात केल्याने शेताशिवार हिरवेगार झाले आहेत. पण ज्यांची जमीन या प्रकल्पात गेली असे २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त  'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन' म्हणत आर्त हाक देत आहेत.केळोशी बुकक (ता . राधानगरी ) येथील बैलगोंड ओढयावर १९९७-९८ मध्ये ५६०३ .२२५ घनमीटर साठवण क्षमतेचा मध्यम प्रकल्प उभारणीच्या कामास सुरवात झाली. काम दोन तीन वर्षांनी सुरू झाले. पहिल्याच टप्प्यात धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता.

आमचे पुनर्वसन प्रथम करा व मगच जमिनीचा ताबा सोडला जाईल असा हट्ट या शेतकऱ्यांनी धरला होता .पण तडजोडीने गावचे कल्याण होते व गावच्या शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटतोय म्हणून या शेतकऱ्यांनी हट्ट सोडत कसत असलेल्या जमिनी प्रशासनाच्या ताब्यात दिल्या व कामास सुरवात झाली.या घटनेला आता जवळपास २० वर्षे लोटली. सबंधीत शेतकऱ्यांनी आम्हाला आमच्या जमिनिच्या बदल्यातल्या जमिनी देऊ करा म्हणुन या वीस वर्षात किती हेलपाटे शासन दरबारी मारले याला गणितच नाही.

गेल्या चार वर्षापासून तर या प्रकल्पातील पाणी अडवले असून अडवलेल्या पाण्याचा काठावरील व शिवारातील शेतकरी पुरेपूर वापर करत आहेत, त्यांची शेती हिरवाईने नटली आहे. पण ज्या लोकांनी हे धरण व्हावे म्हणून स्वतःची शेतीवाडी या धरणासाठी बहाल केली ते शेतकरी मात्र अद्यापही उपेक्षितच आहेत . त्यांना ना योग्य मोबदला दिला गेला, ना जमीन ! त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता आर्त टाहो फोडत आम्हाला कोणी जमीन देता का जमिन म्हणत आपले गाऱ्हाने 'लोकमत ' कडे मांडले आहे .

  • धरण परिसरात सरकारी मालकीचे ७८५ , २४,८१२ ,८२०,९०५,८८० , ८३८ इतके गट नंबर असून या गटात जवळपास ७० एकर जमीन शिल्लक असताना व शेतकऱ्यांनी या गटाचा पसंती क्रम दिला असताना प्रशासन का चालढकल करते आहे याचे उत्तर प्रशासनानेच द्यावे ! 
  •  संबंधित शेतकऱ्यांनी जमिनी देय देण्यासाठी धरणाचे काम सुरू असताना अनेक वेळा काम बंद आंदोलन केले होते. पण ठेकेदारानेही वेळ मारून नेत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे .
टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर