शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

Kolhapur: पाटगावच्या जंगलात टस्कर दाखल, पिकांचे केले नुकसान

By संदीप आडनाईक | Updated: April 20, 2024 18:15 IST

हालचालींवर वनविभागाची नजर

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील अंतुर्ली-शिवडाव जंगलातून पाटगाव जंगलातील मानोपे वनक्षेत्रात टस्करने मुक्काम ठोकल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आजरा वनविभागाच्या हद्दीतून दहा दिवसांपूर्वी निघालेला हा हत्ती डेळे, चिवाळे, चाफेवाडी, पाळ्याचा हुडा, अनफ खूर्द, अंतुर्ली, शिवडाव, विंजोळे या मार्गावरुन आज पहाटेच्या सुमारास पाटगाव जंगलातील मानोपे वनक्षेत्रात मुक्कामाला आला आहे. कोंडूशी, अंतुर्ली गावातून प्रवास करत शिवडाव येथील रेडे ओहळ, मानोपे जंगल परिसरात या टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून तो खाण्यापेक्षा पिकांची नासधूस अधिक करत आहे.आजरा तालुक्याच्या वनहद्दीतून गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी या टस्करने तालुक्यातील डेळे-भारमलवाडी जंगलात विश्रांती घेतली होती. त्यानंतर या टस्करने चाफेवाडी या जंगलातून पाळ्याचा हुडा आणि अनफ खुर्द या गावातून कोंडूशी, अंतुर्ली वनहद्दीत प्रवेश केला. रात्री अन्न आणि पाण्याच्या शोधात आलेल्या या हत्तीने अंतुर्लीच्या जंगलातून फेरफटका मारत शिवडाव, नाईकवाडी, पाटगांव, आडे या गावातील शेत शिवारात तो दाखल झाला.हालचालींवर वनविभागाची नजरदरम्यान, या हत्तीच्या हालचालींवर उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडगांव वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, तांबाळेचे वनपाल किरण पाटील, पाटगावच्या वनपाल लुडदिना डिसोझा तसेच इतर क्षेत्रीय कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

ग्रामस्थांना इशाराहत्तीचा वावर शेत शिवारात दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाने केले आहे. या परिसरातील शेतातील भात पिकाचे आणि ऊस पिकाचे नुकसान हत्तीने केले आहे. टस्करचा वावर असलेल्या ठिकाणी ग्रामस्थांनी जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग