जिल्ह्यात पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के चुरशीने मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 18:03 IST2020-12-01T17:59:36+5:302020-12-01T18:03:12+5:30
Vidhan Parishad Election, Pune, kolhapur, Voting पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी चुरशीने मतदान झाले. दुपारी चारपर्यंत पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी राज्यात सर्वाधिक आहे. या दोन्ही मतदारसंघातील एकूण ९८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

जिल्ह्यात पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के चुरशीने मतदान
कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी चुरशीने मतदान झाले. दुपारी चारपर्यंत पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी राज्यात सर्वाधिक आहे. या दोन्ही मतदारसंघातील एकूण ९८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी लढत झाल्याने जिल्ह्यात चुरस, इर्ष्येने मतदान झाले. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आदी नेत्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यासह मतदान केंद्रांना भेटी देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पदवीधरसाठी २०५,तर शिक्षकसाठी ७६ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचे पालन करून मतदान झाले. सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. शिक्षकांच्या केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेतीननंतर पुन्हा गर्दी वाढली ती मतदानाची वेळसंपेपर्यंत कायम होती.
पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर आणि अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, रेखा पाटील, आदींसह एकूण ९८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.