तुळशी धरण तुडुंब, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 18:20 IST2018-08-07T18:19:26+5:302018-08-07T18:20:44+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, पण त्यानंतर उघडीपच राहिली. राधानगरी तालुक्यातील तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून प्रतिसेकंद २५२ घनफूट पाणी प्रवाहित झाले आहे.

तुळशी धरण तुडुंब, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, पण त्यानंतर उघडीपच राहिली. राधानगरी तालुक्यातील तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून प्रतिसेकंद २५२ घनफूट पाणी प्रवाहित झाले आहे.
गेले दोन आठवडे असणारा पावसाचा जोर काहीसा ओसरला असून मंगळवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहरात सकाळपासूनच उघडीप राहिली, दिवसभर काहीवेळ ऊन होते. सायंकाळनंतर पावसाची भुरभुर सुरू झाली. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने तुळशी धरण मंगळवारी सकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. ‘तुळशी’ धरणाची ३.४७१ टी. एम. सी. क्षमता आहे.
जिल्ह्यात सरासरी ८.६१ मिलिमीटर पाऊस आहे. सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात १९.५० मिलिमीटर झाला आहे. गगनबावडा, भुदरगड, चंदगड तालुक्यातही चांगला पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी सोमवारपेक्षा मंगळवारी साडेतीन फुटांनी कमी झाली आहे. अजूनही बारा बंधारे पाण्याखाली आहेत.