शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

आयटीआयचे विद्यावेतन ४० वरून ५०० रुपयांवर, तब्बल ४० वर्षानंतर झाली वाढ

By पोपट केशव पवार | Published: September 19, 2023 5:02 PM

प्रशिक्षणार्थींना मासिक खर्चाला हातभार

पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे तीन-चार वर्षात नवी वेतनवाढ मिळाली नाही तर रस्त्यावर उतरणाऱ्यांची संख्या उदंड झाली असताना दुसरीकडे मात्र, तब्बल ४० वर्षानंतर विद्यावेतनात वाढ झाल्याचा अनुभव शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांच्या वाट्याला आला आहे. विशेष म्हणजे ४० रुपयांचे तुटपुंजे विद्यावेतन थेट ५०० रुपये केल्याने निदान मासिक खर्चाला तरी ही रक्कम हातभार लावेल अशी भावना प्रशिक्षणार्थ्यांची झाली आहे. राज्यात शासकीय आयटीआयच्या कॉलेजची संख्या ४१८ असून प्रशिक्षणार्थींची संख्या सुमारे लाखभर आहे. त्यांना याचा लाभ होऊ शकेल.शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक खर्चासाठी देण्यात येत होते. या विद्यावेतनात कोणतीच वाढ करण्यात आली नव्हती. एकीकडे वाढती महागाई, शैक्षणिक साहित्यामध्ये वारंवार होणारी दरवाढ यामुळे या विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी प्रशिक्षणार्थी करत होते. मात्र, या मागणीला गेल्या ४० वर्षांपासून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.

अखेर १७ ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे ४० रुपयांचे विद्यावेतन ५०० रुपये करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्याचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला. यामुळे गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभशासकीय आयटीआयमधील एकून विद्यार्थी क्षमतेच्या निम्म्या विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १२ शासकीय आयटीआयची कॉलेज असून यामध्ये ३,२३१ हून विद्यार्थ्यांची क्षमता आहे. त्यामुळे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभअनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागार्स, भटक्या मागास, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास वर्गातील विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन मिळेल. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची ८० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढल्याने गरीब, गरजू विद्यार्थ्यांना त्याचा अधिक लाभ होईल. त्यांचा मासिक खर्च भागविण्यासाठी ही रक्कम त्यांना उपयोगी पडेल. मात्र, विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. - महेश आवटे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंबा, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरiti collegeआयटीआय कॉलेज