कणकवली : मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शासनाने लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.कणकवली येथे आलेल्या तावडे यांची भेट मराठा आरक्षण संघर्ष समिती तसेच अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष एस. टी. सावंत, उपाध्यक्ष लवू वारंग, सरचिटणीस अविनाश राणे, हरेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने गठीत केलेल्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष शिक्षणमंत्री स्वत: असल्याने त्यांनी आरक्षणासाठी प्रयत्न करावेत. यापूर्वी विधानपरिषदेचे सदस्य असताना मराठा आरक्षणासाठी आपण आवाज उठविला होता. त्याप्रमाणेच मराठा समाजबांधवांची भावना लक्षात घेऊन शासनाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असेही म्हटले आहे. (वार्ताहर)
मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत
By admin | Updated: December 5, 2014 23:37 IST