शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

नांगनूरचा दूषित पाणीप्रश्नी संघर्ष !

By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST

‘हिरण्यकेशी’त दूषित पाणी : नदीत मळी मिसळल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर

राम मगदूम - गडहिंग्लज -गडहिंग्लजच्या पूर्वेकडील नांगनूर गावच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीच्या पात्रात मळीमिश्रित सांडपाणी मिसळते. त्याच ठिकाणी नळयोजनेचे जॅकवेल असल्यामुळे गावाला दूषित पाण्याचाच पुरवठा होतो. पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरूद्ध कारवाई व्हावी व ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या ७ वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. मात्र, माय-बाप सरकारला अजून जाग आलेली नाही.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नांगनूरची लोकवस्ती ३ हजार आहे. गावाला स्वच्छ व शुद्ध पाणी प्यायला मिळावे म्हणून ‘जलस्वराज्य’ प्रकल्पांतर्गत ३३ लाखांची नळयोजना राबविण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी गावातील नळांना मीटरही बसविण्यात आले आहेत. हिरण्यकेशी नदीच्या तीरावर जॅकवेल बांधण्यात आले आहे. ट्रेंच गॅलरीद्वारे नदीतील पाणी ६० फुटांवरून जॅकवेलमध्ये टाकून गावाला वितरीत केले जाते. याच जॅकवेलच्या परिसरात मळीमिश्रित सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळते. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी अद्यापही बोअर आणि खासगी विहिरींचाच आधार घ्यावा लागत आहे. प्रदूषित पाण्यामुळे ही नळयोजना कुचकामी ठरली आहे.संकेश्वरच्या हिरण्यकेशी साखर कारखान्यातून सोडण्यात येणारे मळीमिश्रित सांडपाणीच नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीच्या पाण्यात मिसळते. पाणी प्रदूषित होवून मासे मृत्यूमुखी पडतात. पाण्याला दुर्गंधी सुटते, जनावरेदेखील ते पाणी पित नाहीत. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि मळीमिश्रित पाणी नदीत सोडण्यास प्रतिबंध करावा, यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सुरू आहे.पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहारतलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकरांपासून तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.प्रदूषण मंडळाकडूनही बेदखलमहाराष्ट्र व कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळासह दिल्लीच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील अर्ज-विनंत्या केल्या. मात्र, याबाबत अजूनही न्याय मिळालेला नाही.