शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तिहेरी अपघातात तरुण ठार; टेम्पो चालकाने अचानक ब्रेक मारला, दुचाकीस्वार घसरून एसटीच्या चाकाखाली सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 15:41 IST

अपघाताची माहिती मिळताच प्रशांतचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली. कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

कोल्हापूर : एसटी, छोटा हत्ती टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तरुण प्रशांत संभाजी कांबळे (वय २३, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) हा एसटीच्या मागील चाकाखाली सापडला. सीपीआरमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवरील ओंकार बाबासाहेब समुद्रे (वय २४) आणि गणेश देवदास समुद्रे (वय २४, दोघेही रा. शिरोली पुलाची) हे किरकोळ जखमी झाले. पुणे-बंगळुरू महामार्गावर सोमवारी (दि. २६) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.अपघातस्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे हा सोमवारी दुपारी त्याच्या दुचाकीवरून दोन मित्रांसह टोप (ता. हातकणंगले) गावात गेला होता. तेथून परत शिरोलीला येताना शिये फाटा येथे धनराज हॉटेलजवळ समोरच्या छोटा हत्ती टेम्पोच्या चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यावेळी प्रशांतने दुचाकीचा ब्रेक लावल्याने दुचाकी घसरून रस्त्यावर पडली. त्याचवेळी बाजूने कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या मागील चाकाखाली प्रशांत सापडला. त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्याचे दोन्ही मित्र विरुद्ध दिशेला पडल्याने सुदैवाने बचावले. अपघातानंतर जखमी प्रशांतला १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रशांत याच्या पश्चात आई, वडील आणि पाच विवाहित बहिणी आहेत. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली.कुटुंबीयांचा आक्रोशप्रशांत शिरोलीत फॅब्रिकेशनचे काम करत होता. त्याची आई अंगणवाडी सेविका आहे, तर वडील खासगी कंपनीत काम करतात. अपघाताची माहिती मिळताच प्रशांतचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली. कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू