शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

सेवाग्राम आश्रमातील झाडे तोडली, कोल्हापुरात आबा कांबळेंचा 'आत्मक्लेश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:19 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली

कोल्हापूर : सेवाग्राम आश्रमातील आणि नई तालीम परिसरातील झाडे अवैधरीत्या तोडल्याचा निषेध करून गो गीता सेवा संस्थेचे आबा कांबळे यांनी कळे येथे सोमवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती दिवशी एक दिवसाचे आत्मक्लेश उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.गो गीता सेवा संस्था येथे आचार्य विनोबा भावे यांच्या प्रतिमेचे पूजन शरद जोशी, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव जाधव आणि संस्थेचे माजी उपाध्यक्ष सरदार आंग्रे यांच्या हस्ते झाले. सर्व धर्म प्रार्थनेनंतर त्यांनी उपोषण केले. याप्रकरणी महसूल आणि वनमंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आले आहे. दरम्यान वर्ध्याचे वन परीक्षक अधिकारी रुपेश भास्करराव खेडकर यांनी दूरध्वनीवरून दोन दिवसात चौकशी करून कारवाई करत असल्याचे कळवून उपोषण सोडण्याची विनंती केली. सायंकाळी पाच वाजता सायंप्रार्थनेनंतर किरवे येथील पोलिस पाटील प्रशांत पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले. उपोषणस्थळी कळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. संस्थेचे माजी सेक्रेटरी दामाजी वाळवेकर, खजानिस गणपतराव पाटील, बाबा रेडीकर, गीता सेवा संस्थेचे व्यवस्थापक डॉ. नामानंद कांबळे, डॉ. सुनंदा कांबळे, शेतकरी संघटनेचे बबन खाटांगळेकर, पंचगव्य चिकित्सक प्रणय शेलार, डॉ. विनायक साळुंखे, प्रमिला वनकुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर