शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

उचगाव परिसरातील झाडांना पाणी देण्यासाठी रोज धडपडताहेत वृक्षप्रेमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रेल्वे उड्डाण पूल ते उचगाव जकात नाका परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सुमारे एक हजारहून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : रेल्वे उड्डाण पूल ते उचगाव जकात नाका परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सुमारे एक हजारहून अधिक झाडांना पाणी घालण्यासाठी या परिसरातील वृक्षप्रेमी, शाळेतील विद्यार्थी रोज धडपडत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना हातभार लावण्याची गरज आहे.

रेल्वे उड्डाण पूल ते उचगाव जकात नाका या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा ‘झाडे जगवा’ उपक्रमांतर्गत आमदार ऋतुराज पाटील यांनी हजाराहून अधिक झाडे लावली आहेत. या झाडांना महानगरपालिकेमार्फत रोज पाणी घालण्यात येते. परंतु उन्हाळ्यात झाडांना पुरेसे पाणी मिळाले, तर ही झाडे जगतील, या विचारातून परिसरातील वृक्षप्रेमींनी व्हॉट्‌स अपच्या ग्रुपद्वारे झाड ग्रुप स्थापन केला असून, या झाडांना रोज पाणी देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या ग्रुपमध्ये सुमारे तीस ते पस्तीस वृक्षप्रेमी सहभागी झाले आहेत.

परिसरातील वृक्षप्रेमी कुटुंबाने सर्वप्रथम गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात या झाडांना पाणी देण्यास प्रारंभ केला. उन्हाळ्यात त्यांनी स्वत: पैसे खर्च करून आठवड्यातून दोनवेळा टँकरने पाणी दिले. त्यांचे पाहून सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांनीही पाणी देण्यासाठी मदत देऊ केली. काहींनी पैसे देऊ केले. आता एका ढकलगाडीत पाण्याची मोठी टाकी ठेवून दुतर्फा असलेल्या झाडांना ५० हून अधिक प्लास्टिकच्या कॅनमार्फत हे पाणी घातले जाते.

ट्री गार्डवर लक्षवेधी फलक लावून जनजागृती

‘मी तुम्हाला भरपूर ऑक्सिजन देतो, कृपया झाडांना पाणी द्या. ऑक्सिजन खूप महाग आहे. ओ दादा, मला पाणी द्या. दादा, मला खूप तहान लागली आहे. झाडे वाचवा, देश वाचवा. तुम्हाला जसे पाणी लागते, तसे मलाही लागते...’, असे संदेश लिहिलेले फलक या मार्गावर लावलेल्या प्रत्येक झाडांभोवती लावले आहेत. या ग्रुपमधील वृक्षप्रेमींच्या मुलांनी आपापल्यापरीने हा खारीचा वाटा दिला आहे.

शाळकरी मुलांनी झाडे घेतली दत्तक

उचगाव जकात नाका ते टेंबलाई मंदिर परिसरातील झाडांना आंतरभारती शिक्षण संस्थेच्या करवीर प्रशाला, विक्रमनगर, टेंबलाई विद्यालय आणि भाई माधवरावजी बागल हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी, तसेच माजी विद्यार्थ्यांनी काही झाडे दत्तक घेऊन त्यांना रोज पाणी देण्याची जबाबदारी पार पाडली.

-----------------------------

फोटो: 22032021-kol-uchgaon tree water supply.jpg

फोटो ओळी :

उचगाव जकात नाका ते टेंबलाई मंदिर परिसरातील झाडांना वृक्षप्रेमींमार्फत रोज पाणी दिले जाते.

===Photopath===

220321\22kol_1_22032021_5.jpg

===Caption===

फोटो: 22032021-kol-uchgaon tree water supply.jpgफोटो ओळी : उचगांंव जकात नाका ते टेंबलाई मंदिर परिसरातील झाडांना वृक्षप्रेमींमार्फत रोज पाणी दिले जाते.