गडहिेंग्लज शहरात दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 19:37 IST2021-06-18T12:17:57+5:302021-06-18T19:37:43+5:30
Accident Kolhapur : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज आजरा मागार्वर हॉटेल सूर्यासमोर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

गडहिेंग्लज शहरात दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार
गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज आजरा मागार्वर हॉटेल सूर्यासमोर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
गडहिंग्लज आजरा मार्गावर चालत्या दुचाकीवर झाड पडल्यामुळे शांताबाई पांडुंरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल ता. गडहिंग्लज) आणि नातू सतिश जोतिबा शिंदे (वय ३६, रा. अत्याळ) यांचा जागीच मृत्यू झाला.
सतिश आपल्या आजीला गावी घेउन गेला होता. आज सकाळी तिला गावी परत सोडण्यासाठी दुचाकीवरुन जाताना हा अपघात झाला. गडहिेंग्लज शहरातील हॉटेल सूर्यासमोर ते दोघे आले असता अचानक त्यांच्या दुचाकीवर हे झाड पडले.
यामध्ये दोघांनाही मोठी दुखापत झाली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव सुरु होता. तेथील नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु दुर्देवाने दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर तहसीलदार दिनेश पारगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.