कोल्हापूरात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

By सचिन भोसले | Updated: June 16, 2023 23:46 IST2023-06-16T23:45:45+5:302023-06-16T23:46:06+5:30

केतकी खोत गुन्हे अन्वेषण विभागातून कोल्हापुरात बदली झाली आहे.

Transfer of six police inspectors in Economic Crime Investigation Branch in Kolhapur | कोल्हापूरात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

कोल्हापूरात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

कोल्हापूर  - आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील निरीक्षक औदुंबर पाटील यांची शुक्रवारी नवी मुंबई येथे बदली झाली. पाटील यांच्यासह सहा जणाचा समावेश आहे. राज्यात कालावधी पूर्ण झालेल्या निःशस्त्र पोलिस निरीक्षकांच्या आज बदल्या झाल्या. एकूण ३३६ निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून काहींना पदोन्नती ही देण्यात आली आहे. तर काहींना मुदत वाढ ही दिली आहे.

कोल्हापुरातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील यांची बदली नवी मुंबई येथे बदली झाली. तसेच अशोक भवड यांची अहमदनगर येथे बदली झाली. विकास भुजबळ गुन्हे अन्वेषण विभागातून, अविनाश कवठेकर दहशतवाद विरोधी पथकातून,किशोर शिंदे यांची राज्य गुप्त वार्ता विभागातून कोल्हापूर येथे बदली. तसेच केतकी खोत गुन्हे अन्वेषण विभागातून कोल्हापुरात बदली झाली आहे.

Web Title: Transfer of six police inspectors in Economic Crime Investigation Branch in Kolhapur

टॅग्स :Policeपोलिस