शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: एएस ट्रेडर्सच्या तपास अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, मुख्य सूत्रधारासह नऊ संशयित अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 11:37 IST

सुमारे नऊ कोटीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स गुन्ह्याचा तपास करणाऱ्या निरीक्षक स्वाती देशमुख यांची पासपोर्ट विभागाकडे बदली झाली. नंदूरबार येथून बदली होऊन आलेले निरीक्षक रवींद्र कळमकर यांची गायकवाड यांच्या जागी नियुक्ती झाली असून, एएस ट्रेडर्स गुन्ह्याचा तपास कळमकर यांच्याकडे सोपवण्यात आला.कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याबद्दल एएस ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि एजंटचे अटकसत्र सुरू आहे. पोलिस निरीक्षक स्वाती देशमुख यांनी या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्यासह नऊ संशयितांना अटक करून सुमारे आठ ते नऊ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

गुन्ह्याचा तपास गतिमान झालेला असतानाच, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अचानक गायकवाड यांची पासपोर्ट विभागात बदली केली असून, या जागी रवींद्र कळमकर यांची नियुक्ती केली. कळमकर हे मूळचे अहमदनगर येथील असून, नंदूरबार येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत होते. एएस ट्रेडर्सच्या गुन्ह्याचा अभ्यास करून पसार असलेले अन्य संचालक आणि एजंटचा शोध घेतला जाईल, अशी माहिती तपास अधिकारी कळमकर यांनी दिली.संचालक दत्तात्रय तोडकर स्वत:हून हजरया गुन्ह्यातील संशयित दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (रा. कोडोली, ता. पन्हाळा) हा सोमवारी (दि. ९) स्वत:हून न्यायालयात हजर झाला. पोलिस त्याचा मंगळवारी ताबा घेणार आहेत, अशी माहिती तपास अधिकारी कळमकर यांनी दिली.

नामदेव पाटील याची बँक खाती गोठवलीअटकेतील नामदेव पाटील याच्या मालमत्तांचा छडा लावण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले असून, त्याची दोन बँक खाती गोठवली आहेत. एएसमधून मिळालेल्या पैशातून त्याने जमीन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस