Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:51 AM2019-10-11T11:51:28+5:302019-10-11T11:53:28+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यातील गुरुवारी ३३ बसेसचा वापर करण्यात आला, तर आज, शुक्रवारी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ४९ बसेसचा वापर होणार आहे, अशी माहिती निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली.

Training for polling staff T Buses | Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेस

 विधानसभा निवडणुकीतील प्रशिक्षणासाठी मतदान कर्मचाऱ्यांकरिता एस. टी. बसेसची सोय करण्यात आली आहे.

Next
ठळक मुद्देमतदान कर्मचाऱ्यांसाठी ८२ एस. टी. बसेसचे नियोजन जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षण

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यातील गुरुवारी ३३ बसेसचा वापर करण्यात आला, तर आज, शुक्रवारी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ४९ बसेसचा वापर होणार आहे, अशी माहिती निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रशिक्षणाच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी गुरुवारी ३३ एस. टी. बसेस पाठविण्यात आल्या. यामध्ये आजरा, गारगोटी, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज येथून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आणण्यात आले.

राधानगरीमधून कागल आणि गडहिंग्लज येथे, पन्हाळा आणि शाहूवाडी येथून जयसिंगपूर येथे, कोल्हापूर, कागल येथून गडहिंग्लज येथे, तसेच कोल्हापूरमधून मुरगूड येथे, चंदगड मधून गारगोटी आणि कागल येथे, गडहिंग्लजमधून मुरगूड येथे, कागलमधून गडहिंग्लज आणि गारगोटी येथे, हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी येथून पन्हाळा येथे, तसेच शाहूवाडीमधून हातकणंगले आणि जयसिंगपूर या ठिकाणी होणाऱ्या आजच्या प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी या एस. टी. बसेसचा वापर करण्यात आला. आज, शुक्रवारी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ४९ एस. टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे, असे गलांडे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Training for polling staff T Buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.