कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकात वाहतूक कोंडी, वाहनांच्या मोठ्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 18:01 IST2021-12-08T17:48:06+5:302021-12-08T18:01:33+5:30

शिरोली : तावडे हॉटेल चौकात वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली होती. आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास तावडे ...

Traffic jam at Tawde Hotel Chowk in Kolhapur | कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकात वाहतूक कोंडी, वाहनांच्या मोठ्या रांगा

कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकात वाहतूक कोंडी, वाहनांच्या मोठ्या रांगा

शिरोली : तावडे हॉटेल चौकात वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली होती. आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास तावडे हॉटेल बोगदा आणि चौक जाम झाला होता. यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

गांधीनगरहून कोल्हापूरकडे आणि कोल्हापूरकडून गांधीनगरच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या रांगा शिरोली जकात नाका निगडेवाडी पर्यंत गेल्या. तर पुणे बंगळूर महामार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली. बंगळूरहून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक कोंडी झाली तसेच पुण्याहून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक ठप्प होवून वाहनांची रांग लांब पर्यंत गेली होती. याठिकाणची वाहतुकीची समस्या गेल्या अनेक दिवसापासून आहे.

तावडे हॉटेल बोगदा लहान असल्याने येथे वाहतूक कोंडी होते ही कोंडी कमी करण्यासाठी कायमपणे वाहतूक पोलीस ठेवणे गरजेचे आहे.

Web Title: Traffic jam at Tawde Hotel Chowk in Kolhapur