शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Kolhapur News: चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली ओढ्यात कोसळली, चालक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 16:51 IST

प्रकाश पाटील कोपार्डे : बालिंगा ता. करवीर गावच्या पूर्वेला असलेल्या कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर ओढ्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्राँली ...

प्रकाश पाटीलकोपार्डे : बालिंगा ता. करवीर गावच्या पूर्वेला असलेल्या कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर ओढ्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्राँली थेट ओढ्यात कोसळल्याने चालक ठार झाला. सुरेश सुभाष जगताप (वय ३०) रा. सावर्डे दु। असे मृत चालकाचे नाव आहे. अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. ही घटना आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सावर्डे दु। येथील दिनकर कारंडे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर सुरेश सुभाष जगताप हा चालक म्हणून काम करत होता. सकाळ तो वीट व्यवसायासाठी कसवा वाळू आणण्यासाठी सावर्डे दु।हून कोल्हापूरकडे निघाला होता. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगेच्या पूर्वेला असणाऱ्या छोट्या मोहरीवर तो आला. यावेळी समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. यात ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल ओढ्यात कोसळला. चालक जगतापने ट्रॅक्टरवरून उडी घेत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो थेट ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने चिरडला गेला. यात तो जागीच ठार झाला. करवीर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृत चालक सुरेशच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू