Kolhapur: दाजीपूर अभयारण्यात येत्या शनिवार, रविवारी पर्यटकांना बंदी
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 27, 2023 18:57 IST2023-12-27T18:56:16+5:302023-12-27T18:57:29+5:30
कोल्हापूर : नववर्षाच्या स्वागतासाठी राधानगरी, दाजीपूर, सागरेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून निसर्गाची हानी होऊ नये यासाठी येथे शनिवारी व रविवारी ...

Kolhapur: दाजीपूर अभयारण्यात येत्या शनिवार, रविवारी पर्यटकांना बंदी
कोल्हापूर : नववर्षाच्या स्वागतासाठी राधानगरी, दाजीपूर, सागरेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून निसर्गाची हानी होऊ नये यासाठी येथे शनिवारी व रविवारी (३० व ३१ डिसेंबर) पर्यटकांना प्रवेशास बंदी करण्यात आली आहे.
अभयारण्यात येणाऱ्या नागरिकांकडून तेथे पार्टी करणे, आग पेटवणे, मद्यप्राशन करणे अशा घटना घडतात. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी विभागीय वनअधिकारी कार्यालयाच्यावतीने या दोन दिवशी अभयारण्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
वनरक्षक व वनपाल यांच्या ड्युटीचे नियोजन करून येथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक किंवा पर्यटक ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी दाजीपूरला जाण्याचा विचार करत असतील तर हा प्लॅन रद्द करावा लागेल.