कोल्हापूर : संस्कृती, इतिहास आणि पर्यटन विकासाच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत व जिल्हा प्रशासनाच्या सहयोगातून आज मंगळवारपासून चार दिवस पन्हाळगडावर पर्यटन महोत्सव होत आहे. आमदार विनय कोरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत गुरुवारी (दि. ६) मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १३ डी थिएटरचे लाेकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण होणार आहे. येथील इंटरप्रिटेशन सेंटर येथे आज सायंकाळी ५ वाजता महोत्सवाचे उद्घाटन व ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाला सुरुवात होईल. गुरुवारी इंटरप्रिटेशन सेंटर येथे सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण व १३ डी थिएटरचे लोकार्पण व जनसंवाद कार्यक्रम होईल. तरी नागरिक, पर्यटकांनी याचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्याचे कार्यक्रम
- दुपारी ४ वाजता : शिवतीर्थ उद्यानासमोर ऐतिहासिक नृत्य-नाट्य व शिवजन्म ते शिवराज्यभिषेक सोहळा
- सायंकाळी ५.३० : मराठी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम
- दि. ७ मार्च (शुक्रवारी) : सकाळी ९ वाजल्यापासून अंबरखाना येथे चित्रकार, शिल्पकारांची प्रात्यक्षिके
- दुपारी ४ वाजता : जिल्ह्यातील गडकिल्ले यावर इंस्टाग्राम रील्स, यू-ट्युब व्हिडीओ व फोटोग्राफी स्पर्धा व पारितोषिक वितरण
१३ डी थिएटरमधून ऐतिहासिक घटनांचे सादरीकरणपन्हाळा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पुनीत झालेले पर्यटनस्थळ असल्याने दरवर्षी २० ते २५ लाख पर्यटक, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी भेट देतात. येथे स्टेरीओस्कोपिक १३ डी थिएटरउभारले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऐतिहासिक कलाकृती पाहता येणार आहे. गुरुवारी पन्हाळ्याचा रणसंग्राम हा लघुपट व १३ डी थिएटरचा लोकर्पण सोहळा होत आहे. तसेच लाइट, साऊंड शो, लेजर शो तसेच इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीचे काम व परिसराचे सुशोभीकरण झाले आहे.