शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

एकाच बैठकीत तब्बल २८५ आरक्षणे उठविली

By admin | Updated: October 19, 2015 00:43 IST

‘ताराराणी’वर आरोप : राष्ट्रवादीचा जाहीरनामा

कोल्हापूर : महापालिकेमध्ये ताराराणी आघाडी सन २००० ते २००५ या काळात सत्तेवर असताना एकाच बैठकीत तब्बल २८५ आरक्षणे उठविली. त्यांचा बाजार मांडला. तेच नेते बाशिंग बांधून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत, अशी बोचऱ्या टीकेची नोंद राष्ट्रवादी पक्षाने रविवारी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात आहे. याशिवाय गेल्या जाहीरनाम्यात असलेली ९० टक्के कामे पूर्ण केल्याचा दावाही केला आहे. पाच वर्षांत राज्य शासनाकडून आलेल्या निधीतून झालेली विविध विकासकामे सचित्र जाहीरनाम्यात आहेत. जाहीरनाम्याची आकर्षक आणि लक्षवेधी अशी आठ ग्लेझची पाने आहेत. त्यात म्हटले आहे, पाच वर्षांत एकूण १२३० कोटी रुपयांचा निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलला. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त करांचा बोजा लादला नाही. एकाही जागेचे आरक्षण उठविले नाही. दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर महापालिकेत घोडेबाजाराला ऊत आला होता. घोड्यांची रेस आणि रेसकोर्स असे विदारक चित्र झाले होते. कोणताही विचार नाही, धोरण नाही. पंधरा-सोळा वर्षांत केवळ ५८ कोटींचा निधी आणला. मात्र राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी पक्षीय राजकारण रुजविले. १२३० कोटींची विकासकामे झाली. दिवंगत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचे स्मारक उभारणे, फ्लायओव्हर पुलांची निर्मिती करणे, रंकाळा तलाव सुशोभित करणे, सीसीटीव्हीयुक्त शहर करणे, सोलर, इको शहर बनविणे, बहुमजली पार्किंग व्यवस्था निर्माण करणे,घनकचरा व्यवस्थापन करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, आदी कामे करणार असल्याचे जाहीरनाम्यात सांगितले आहे. आघाडी कायम..राष्ट्रवादी पक्षाने निवडणुकीत सर्वप्रथम प्रभागनिहाय उमेदवार जाहीर केले. त्यानंतर जाहीरनामा प्रसिद्धी करणे, प्रचाराचा नारळ फोडणे यामध्येही आघाडी कायम राखली.