कोल्हापूर : अरबी आणि उर्दू शिकण्यासाठी येणाऱ्या १० वर्षीय मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी शिकवणी घेणारा शिक्षक मुहमंदतल्हा मुस्तफा शेख (वय २७, रा. यादवनगर, कोल्हापूर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दोषी ठरवले. त्याला २० वर्षे सक्त कारावास, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. हा गुन्हा नोव्हेंबर २०२१ मध्ये घडला होता.सहायक सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलतनगर येथील एका इमारतीत मुहमंदतल्हा शेख अरबी आणि उर्दूची शिकवणी घेत होता. याच्याकडे १० वर्षीय मुलगा शिकण्यासाठी जात होता. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेख याने अल्पवयीन मुलावर अत्याचार केले.हा प्रकार कोणाला सांगितल्यास शिकवणीला घेणार नाही असे धमकावले. घाबरलेल्या पीडित मुलाने घरी जाऊन अत्याचाराची घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी.टी. जौंजाळ यांनी तपास करून शेख याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.ॲड. इंगळे यांनी न्यायालयात आठ साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि ॲड. इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश अगरवाल यांनी आरोपी शेख याला दोषी ठरवले. बाललैंगिक प्रतिबंधक कायदा आणि बालहक्क कायद्यानुसार त्याला शिक्षा सुनावली. सहायक फौजदार नाझनीन देसाई यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.विश्वासघाताची गंभीर दखललहान मुले शिक्षकांवर विश्वास ठेवतात. आई-वडिलांप्रमाणे ते शिक्षकांना सन्मान देतात. याच विश्वासाच्या आधारे दहा वर्षीय मुलगा शेख याच्याकडे शिकवणीसाठी जात होता. मात्र, शिक्षकाने विद्यार्थ्याचा विश्वासघात केला. याची गंभीर दखल घेऊन आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस २० वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनाविल्याची माहिती ॲड. इंगळे यांनी दिली.
Web Summary : Kolhapur teacher, Muhamadtalah Sheikh, sentenced to 20 years for abusing a 10-year-old student. The court also imposed a fine of ₹10,000. The crime occurred in November 2021. The victim confided in his father, leading to the arrest and conviction.
Web Summary : कोल्हापुर में शिक्षक मुहम्मदतलाह शेख को 10 वर्षीय छात्र के शोषण के लिए 20 साल की सजा सुनाई गई। अदालत ने ₹10,000 का जुर्माना भी लगाया। अपराध नवंबर 2021 में हुआ। पीड़ित ने अपने पिता को बताया, जिसके कारण गिरफ्तारी और सजा हुई।