शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’सोबत उद्या बैठक

By admin | Updated: December 1, 2014 00:39 IST

अपूर्ण कामे : आयआरबीच्या प्रतिनिधींना आंदोलकांची धास्ती

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील अपूर्ण कामांची माहिती घेणे, केलेल्या कामांचा आढावा घेणे, कामांतील त्रुटी याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका, रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या प्रतिनिधींची मंगळवारी (दि.२) कोल्हापुरात बैठक होत आहे. शहरातील अपूर्ण कामांबाबत अशा स्वरूपाची दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याची सूचना आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला पत्राव्दारे केली आहे. आंदोलकांच्या धास्तीमुळे ‘आयआरबी’ने ही बैठक पुण्याला घेण्याबाबत प्रयत्न चालविले आहेत.रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातून पलायन केले. एका रात्रीत कोल्हापुरातील कार्यालय पुण्यात हलविले. कोल्हापुरातील २२० कोटी रुपयांचा एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प पूर्ण करण्याची व देखरेखीची संपूर्ण जबाबदारी महामंडळाची आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलने होऊ लागल्यानंतर दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातून पलायन केले.टोलविरोधी कृती समितीने रस्त्याचा दर्जा, युटिलिटी शिफ्टिंग, विजेचे दिवे, रस्त्याकडील चॅनेल, अपूर्ण कामे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. ही सर्व कामे करण्याबाबत महापालिकेनेही वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, महामंडळाने याकडे लक्ष दिले नाही. आयआरबीने तर महापालिकेला पत्र लिहून अपूर्ण कामे करण्यास कोल्हापुरात सुरक्षित वातारवण नसल्याने काम करण्यास असहमती दर्शविली. त्यामुळेच आयुक्तांनी आयआरबी व महामंडळाच्या प्रतिनिधींना अपूर्ण कामांबाबात दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.प्रकल्पातील काही रस्ते अपूर्ण आहेत. रस्त्यांवरील विजेचे दिवे, युटिलिटी शिफ्टिंग, रस्त्यांशेजारील चॅनेल्स, आदी अनेक अपूर्ण कामे ‘आयआरबी’ने करणे गरजेचे आहे. केलेल्या कामांचा दर्जा व टोलबाबत आलेल्या तक्रारीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. अपूर्ण कामांबाबत काही शंका असल्यास एकत्रित भेटी देणेही सोपे होणार आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पाची देखरेख करण्याची जबाबदारी असल्याने महामंडळाचे कार्यालय कोल्हापुरात पूर्ववत होणे गरजेचे आहे. प्रकल्पातील त्रुटी व अपूर्ण कामांवर लक्ष ठेवणे त्यामुळे सोयीचे होणार आहे. मात्र, टोल विरोधी कृती समितीच्या धास्तीने महामंडळ किंवा आयआरबीच्या प्रतिनिधींनी कोल्हापुरात बैठकीस नकार दिला आहे. दर पंधरा दिवसांनी कोल्हापुरात आढावा बैठक घेण्याबाबत आयुक्त ठाम असल्याने आयआरबी व महामंडळाची गोची झाल्याची चर्चा आहे.